गुजरातमध्ये पाकिस्तानची सागरी घुसखोरी आढळून आली; BSF कडून बोट जप्त

पाकिस्तानी बोट भारतीय समुद्री हद्दीमध्ये घुसल्याचे समोर आले आहे.
Boat
Boat@YEARS

वृत्तसंस्था: पाकिस्तानी बोट (Pakistan) भारतीय समुद्री हद्दीमध्ये घुसल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी बीएसएफने ही कारवाई (BSF) केली आहे. भुजमधील हरामी नाला (Harami Nala) भागामधून एका पाकिस्तानी बोटीला ताब्यात घेण्यात आले आहे. समुद्री सीमेवर स्तंभ क्रमांक ११६० जवळ भारतीय सीमेत जवळपास १०० मीटर आतमध्ये ही नाव पकडण्यात आली असल्याची BSF ने सांगितले आहे. काल गुजरातमध्ये (Gujarat) सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी या बोटीवर कारवाई केली आहे. मासेमारी करणारी ही बोट असून या बोटीमध्ये मासे साठवण्याचे सामान देखील आढळून आले आहे.

हे देखील पहा-

एएनआयने याविषयी वृत्त दिले आहे. घातपाताच्या हेतून ही बोट आली होती. की वाट चुकून या बोटीने भारतीय हद्दीत प्रवेश केले आहे, याचा देखील सखोल तपास यंत्रणांकडून केला जात आहे. काल BSF जवानांकडून नियमित पेट्रोलिंग (Patrolling) केले जात होते. यावेळी एक अज्ञात बोट जवानांच्या निदर्शनास आली होती. या बोटीविषयी संशय आल्याने BSF जवानांनी या बोटीच्या दिशेने मोर्चा वळवला आहे. जप्त करण्यात आलेली बोट पाकिस्तान (Pakistan) मधील असल्याची माहिती BSF कडून देण्यात आली आहे. ही एक मच्छिमार बोट होती. भारताच्या १०० मीटर आतपर्यंत ही बोट आल्याची माहिती समोर आली आहे.

गुजरातच्या भुजमधील हरामी नाला परिसरातून या बोटीला ताब्यात घेण्यात आले आहे. बोट ताब्यात घेण्यात आल्यावर या बोटीचा कसून तपास करण्यात आले आहे. एखादी संशयास्पद वस्तू बोटीत आहे का? या हेतूने यावेळी तपास करण्यात आले आहे. मात्र, कोणतीही शंकास्पद वस्तू या बोटींमध्ये आढळून आली नाही, अशी माहिती देण्यात आली आहे. भारतीय हद्दीच्या ११६० नंबर पिलरपासून आतपर्यंत ही बोट आली होती. या बोटीमध्ये काही मासेमार देखील असल्याची माहिती मिळाली आहे. BSF जवानांनी दलदलीचा परिसर आणि अंतर पार कर या बोटीपर्यंत पोहोचून कारवाई करण्यात आली आहे. रविवारी रात्री ८: ३० वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आल्याची माहिती BSF कडून देण्यात आली आहे.

Boat
खळबळजनक! गाढवाच्या चोरीच्या घटनेनंतर आता घरासमोर बांधलेल्या शेळ्यांची चोरी

फेब्रुवारी महिन्यात देखील तब्बल १८ पाकिस्तानी बोटींवर या ठिकाणी कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी देखील BSF ने १८ पाकिस्तानी बोटी जप्त केले होते. BSF च्या क्रीक क्रोकोडाईल कमांडो पथकाने भारतीय हवाई दलाच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली होती. यावेळी ६ पाकिस्तानी मासेकमाऱ्यांनाही ताब्यात घेण्यात आले होते. यानंतर आता परत एकदा ३ एप्रिलला बोटींवर कारवाई करण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com