लहान मुलांचे Online लैंगिक शोषण; महाराष्ट्र, दिल्ली, यूपीसह 14 राज्यांमध्ये CBIचे सर्च ऑपरेशन

लहान मुलांच्या ऑनलाइन लैंगिक शोषण यांचे अतिशय धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत.
लहान मुलांचे Online लैंगिक शोषण; महाराष्ट्र, दिल्ली, यूपीसह 14 राज्यांमध्ये CBIचे सर्च ऑपरेशन
लहान मुलांचे Online लैंगिक शोषण; महाराष्ट्र, दिल्ली, यूपीसह 14 राज्यांमध्ये CBIचे सर्च ऑपरेशनSaam Tv
Published On

नवी दिल्ली : लहान मुलांच्या ऑनलाइन लैंगिक शोषण यांचे अतिशय धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे याचा मुळापासून शोध लावण्यासाठी सीबीआयने महाराष्ट्रासह 14 राज्यांमध्ये सर्च ऑपरेशन (CBI Search Opration) सुरू केले आहे. फक्त दिल्लीमध्ये 83 जणांविरुद्ध एफआयआर FIR दाखल करण्यात आले आहेत. तर अन्य राज्यांमध्ये सीबीआयचे अधिकारी सर्च ऑपरेशन करत आहेत.

या सर्च ऑपरेशनमधून जी माहिती उघडकीस होणार आहे. आणि उघड झालेल्या माहितीनुसार, कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. सीबीआयच्या प्रवक्त्याने एका वृत्तसंस्थेला ही माहिती दिली आहे. ज्या 14 राज्यांमध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे, त्यामध्ये राज्यामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, ओरिसा, दिल्ली, हरियाणा, प्रदेश हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश यांच्यासह केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे.

वृत्तसंस्थेनुसार, 14 नोव्हेंबर या बालदिनी हे सर्च ऑपरेशन सुरू झाले आहे. लहान मुलांच्या लैंगिक शोषणाविषयी अनेक धक्कादायक बाबी या ऑपरेशनमधून समोर येणे शक्य आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिल्लीत केलेल्या कारवाईत ८३ जणांविरुद्ध २३ केसेस दाखल Case Filed केल्या आहेत. त्यांचाही तपशील लवकरच बाहेर येऊ शकतो.

Online Child Sexual Abuse म्हणजे काय ?

ऑनलाइन बाल लैंगिक शोषणामध्ये विविध प्रकारच्या वर्तन आणि परिस्थितींचा समावेश होतो. यामध्ये सामान्यतः ग्रूमिंग, लाइव्ह स्ट्रिमिंग, बाल लैंगिक शोषण सामग्री वापरणे. लैंगिक हेतूंसाठी मुलांना जबरदस्ती करणे आणि त्यांना ब्लॅकमेल करणे यांचा समावेश होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com