One Plus च्या स्मार्टफोनचा खिशात स्फोट; तरुण जखमी

OnePlus कंपनीच्या Nord सीरीजच्या मोबाईलचा स्फोट झाल्याची घटना दिल्लीत घडली आहे. गेल्याच महिन्यात OnePlus Nord-2 चा स्फोट झाल्याची घटना उघडकीस आली होती.
One Plus च्या स्मार्टफोनचा खिशात स्फोट; तरुण जखमी
One Plus च्या स्मार्टफोनचा खिशात स्फोट; तरुण जखमी@Adv_Gulati1
Published On

नवी दिल्ली : OnePlus कंपनीच्या Nord सीरीजच्या मोबाईलचा स्फोट झाल्याची घटना दिल्लीत घडली आहे. गेल्याच महिन्यात OnePlus Nord-2 चा स्फोट झाल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा वन प्लस नॉर्ड-2 5G या स्मार्टफोनचा हा फोन वापरणाऱ्या तरुणाच्या खिशातच स्फोट झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. गौरव गुलाटी असे या मोबाईलच्या वापरकर्त्या तरुणाचे नाव आहे.

विशेष म्हणजे फक्त दहा दिवसांपूर्वीच त्याने हा नवा मोबाईल घेतला होता. मागील दोन-चार दिवसांपासून गौरवने या नव्या फोनचा वापर करण्यास सुरुवात केली होती. या मोबाईलचा स्फोट होण्यापूर्वी फोनची काम करत असताना अचानकपणे त्याच्या खिशातून धूर येऊ लागला आणि या मोबाईलचा मोठा स्फोट झाला. सदर घटनेत गौरव गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याने या घटनेबाबत वनप्लस कंपनीविरोधात पोलीस तक्रार दाखल केली असून त्याच्या ट्विटर अकाउंटवरून स्फोट झाल्यानंतर मोबाईलची झालेली अवस्था याबाबत फोटो आणि माहिती शेयर केली आहे. या माहितीनुसार, गौरव काम करत असताना अचानकपणे त्यांच्या खिशातून धूर येऊ लागला आणि काही समजायच्या आतच मोबाईलचा स्फोट झाला. या घटनेत त्याला गंभीर दुखापत झाली असून मोबाईलमधून आलेल्या धुरामुळे त्याला श्वास घ्यायला त्रास होत आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

One Plus च्या स्मार्टफोनचा खिशात स्फोट; तरुण जखमी
Breaking Solapur : काँग्रेस जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटलांसह 12 जणांवर गुन्हे दाखल

दरम्यान, मोबाईल स्फोटांनंतर गौरवने कंपनीशी संपर्क करून घडल्या प्रकाराबाबत माहिती दिली. कंपनीने आपला प्रतिनिधी पाठवून मोबाईलची प्राथमिक तपासणी केली व पुढील तपासणीसाठी गौरव याला सोबत येण्याची विनंती केली. परंतु पोलीस केस केली असल्याने गौरवने फोन द्यायला नकार दिला. तसेच वनप्लसचा फोन म्हणजे डेथ सर्टिफिकेट (Death Certificate) असल्याचे गौरवने म्हटले आहे. वनप्लसचा फोन खिशात ठेवून मी डेथ सर्टिफिकेट सोबत घेऊन फिरत होतो असेही त्याने म्हटले आहे. सध्या स्फोट झालेल्या मोबाईलचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com