ओमिक्रॉन व्हेरियंटचं निदान करणाऱ्या किटला ICMR ची मंजूरी

देशामध्ये ओमिक्रॉनचे संकट वाढत असताना आता आयसीएमआरने आज ओमिशुअर या किटला मंजूरी दिली
Omicron Variant
Omicron VariantSaam Tv
Published On

वृत्तसंस्था : देशामध्ये ओमिक्रॉनचे संकट वाढत असताना आता आयसीएमआरने आज ओमिशुअर या कीटला (Omisure kit) मंजूरी दिली आहे. ओमिशुअर कीटच्या माध्यमातून ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झाली की नाही याचे निदान करता येणार आहे. यामुळे आता ओमिक्रॉनचं (Omicron) निदान करण्याकरिता फार काळ वाट बघावी लागणार नाही. (Omicron Variant Marathi news)

हे देखील पहा-

देशात कोरोनाचा (Corona) नवीन व्हेरीयटं ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये (patients) सातत्याने वाढ होत आहे. मागील १५ दिवसामध्ये दिल्ली (Delhi) आणि महाराष्ट्रासह (Maharashtra) ओमिक्रॉनची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. त्यातच ICMR ने एक मोठा निर्णय घेतला आहे. ICMR ने पहिल्या Omicron डिटेक्शन किटला मान्यता दिली आहे. टाटा मेडिकलने हे कीट तयार केले आहे. या कीटचे नाव ओमिशुअर असे आहे.

Omicron Variant
Nietsh Rane: भाजप आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीनवर आज हायकोर्टात सुनावणी

दरम्यान, देशात डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून (week) कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसत आहे. भारतामध्ये सोमवारी दिवसभरात ३७ हजार ३७९ नवे रुग्ण आढळले होते. तर ११ हजार ७ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दिलासा देणारी बाब म्हणजे मृतांचा आकडा कमी आहे. गेल्या २४ तासात देशात १२४ जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहे. सध्या दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट हा ३.२४ टक्के इतका आहे. देशात सक्रीय रुग्णांची संख्या १ लाख ७१ हजार ८३० इतकी झाली आहे. तर आतापर्यंत एकूण ३ कोटी ४३ लाख ६ हजार ४१४ जणांनी कोरोनावरती मात केले आहेत. देशामध्ये कोरोनामुळे आजपर्यंत ४ लाख ८२ हजार १७ जणांचा मृत्यू झाला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com