Gorakhpur News: चर्चा तर होणारच! 70 वर्षीय सासऱ्यांनी 28 वर्षीय सुनेसोबत थाटला संसार; वेगवेगळी कारणं आली समोर

उत्तरप्रदेशच्या गोरखपूरमधील या लग्नाची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा सुरु आहे.
Wedding
Weddingsaam tv news

लखनौ : एका अजब लग्नाची सध्या देशभर चर्चा सुरु आहे. चर्चा होण्याचं कारणंही तसंच आहे. कारण चक्क सासऱ्याने आपल्या सुनेसोबत लग्न करुन संसार थाटला आहे. उत्तरप्रदेशच्या गोरखपूरमधील या लग्नाची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा सुरु आहे.

गोरखपूरच्या बरहलगंज परिसरातील ही घटना आहे. कैलाश यादव वय 70 वर्षे यांनी आपली सून पूजा वय 28 वर्षे हिच्याशी मंदिरात लग्न केले. या लग्नाची माहिती ज्यांना ज्यांना कळाली त्या सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. या विवाहित जोडप्याचा फोटो आता व्हायरल होत आहे.

Wedding
Beed Accident: रिक्षा-कंटेनरचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू, तीन प्रवासी जखमी; पोलिसांनी कंटेनर चालकाला 40 किमी पाठलाग करुन पकडलं

कैलास यादव यांच्या पत्नीचे 12 वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर मुलाच्या मृत्यूनंतर सून विधवा झाली होती. मग सासऱ्यांनीच सुनेसोबत संसार थाटण्याचा निर्णय घेतला. वयातील अंतर आणि समाज काय बोलेल याचा विचार न करता दोघांनी मंदिरात जाऊन एकमेकांसोबत लगीनगाठ बांधली.

Wedding
Nandurbar : जन्मापासून दोन्ही हात नाही, आई बालपणीच सोडून गेली; ८ वर्षाच्या गणेशची शिक्षणासाठी धडपड

दोघांनी परस्पर संमतीने लग्न केल्याची माहिती मिळत आहे. या लग्नाची दुसऱी बाजू अशीही समोर येत आहे की, मुलाच्या मृत्यूनंतर वृद्ध सासरच्यांनी सुनेचं दुसरीकडे लग्न लावून दिलं होतं. पण सुन तिथे फार दिवस राहिली नाही आणि पुन्हा पहिल्या सासरी परतली. यानंतर सासरच्यांनीच तिच्या भविष्याचा विचार करून तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला .

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com