किम जोंग उनची बहीण भावासारखीच...दक्षिण कोरियाला अणुबॉम्बने उडवून देण्याची धमकी

उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियाच्या सीमेवर नेहमी तणावाचे वातावरण असते.
Kim Yo-jong
Kim Yo-jongSaam Tv
Published On

उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियाच्या सीमेवर नेहमी तणावाचे वातावरण असते. आता असाच संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांची बहीण किम यो जोंग हिने दक्षिण कोरियाला अणुबॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे.

दक्षिण कोरियास लष्करी संघर्ष करायचा असेल तर उत्तर कोरियाचे सैन्य अण्वस्त्रांचा वापर करू शकते. जर दक्षिण कोरिया लष्करी संघर्षात गुंतला तर आमच्या अण्वस्त्र दलांना अपरिहार्यपणे त्यांचे कर्तव्य पार पाडावे लागेल असा इशारा किम यो जोंग यांनी दिला आहे.

हे देखील पहा -

दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्र्याने उत्तर कोरियावरील हल्ल्यांवर चर्चा करताना जे वक्तव्य केले, ते खूप गंभीर आहे. ही त्यांनी केलेली खुप मोठी चूक आहे असे देखील त्या म्हणाल्या.

या वर्षी उत्तर कोरियाने केलेल्या नवीन शस्त्रास्त्रांच्या चाचणीवरून दक्षिण कोरियामध्ये तणाव वाढला आहे. उत्तर कोरियाने अलीकडेच चार वर्षांहून अधिक काळातील पहिले आंतरखंडीय क्षेपणास्त्र प्रक्षेपित केल्याचे वृत्त आहे. यानंतर जगातील सर्व देशांनी उत्तर कोरियावर टीका केली आहे.

Kim Yo-jong
Navi Mumbai Breaking News: महापे एमआयडीसीत लागली आग; अग्निशमन दल दाखल

या वक्तव्यावरुन उडाला भडका

त्यांच्या देशाच्या सैन्याकडे उत्तम फायरिंग रेंज, सामर्थ्यवान असलेली विविध प्रकारची क्षेपणास्त्रे आहेत. उत्तर कोरियावर त्वरीत हल्ला करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे असे दक्षिण कोरियाचे संरक्षण मंत्री सुह वूक म्हणाले होते.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com