US-China : चीनी नागरिकांशी शरीरसंबंध ठेवू नका!; अमेरिकी सरकारचा बेधडक निर्णय

US Donald Trump Government : ट्रम्प यांच्या आयात शुल्क धोरणानं जगाची झोप उडाली असतानाच, अमेरिकी सरकारचा आणखी एक बेधडक निर्णय चर्चेत आला आहे. चीनमधील त्यांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना चीनी नागरिकांशी शरीरसंबंध ठेवण्यास बंदी घातली आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांना चीनी नागरिकांशी शरीरसंबंध ठेवता येणार नाही, अमेरिकी सरकारचा निर्णय
Donald Trump US Governmentsaam tv
Published On

चीन आणि अमेरिका या दोन देशांत सध्या विस्तवही जात नाही. या दोन्ही देशांतील राजनैतिक, व्यापारी संबंध सर्वश्रूत आहेत. दोन्ही देश एकमेकांविरोधात काही ना काही तडकाफडकी निर्णय घेत असतात. त्यात आता आणखी एका निर्णयाची भर पडली आहे. या निर्णयानं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. अमेरिकी सरकारने चीनमधील सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी नियम लागू केला आहे. चीनच्या नागरिकांशी प्रेमसंबंध किंवा शरीरसंबंध ठेवण्यावर बंदी घातली आहे.

अमेरिकी सरकारनं चीनमध्ये काम करणारे सरकारी कर्मचारी, त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि सुरक्षा मंजुरीप्राप्त कंत्राटदारांना चीनी नागरिकांशी कोणत्याही प्रकारचे रिलेशनशिप आणि लैंगिक संबंध ठेवण्यास बंदी घातली आहे. असोसिएट प्रेस अर्थात एपी या वृत्तसंस्थेला यासंबंधी माहिती मिळाली आहे.

अमेरिकी सरकारनं चीनमधील कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी घालून दिलेल्या या नियमांसंदर्भात सूत्रांनी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर एपी या वृत्तसंस्थेला माहिती दिली. हा नियम जानेवारीमध्येच अमेरिकी दूत निकोलस बर्न्स यांनी चीन सोडण्याच्या काही दिवस आधीच लागू केला होता.

अशा प्रकारच्या रिलेशनशिपबाबत काही अमेरिकी यंत्रणांनी आधीपासूनच कठोर नियम केले आहेत. अन्य देशांत अमेरिकी राजनैतिक अधिकाऱ्यांना तेथील स्थानिक नागरिकांसोबत रिलेशनशिपमध्ये राहणं किंवा त्यांच्याशी लग्न करणेही सामान्य बाब राहिलेली नाही.

मागील वर्षी हा नियम मर्यादित स्वरुपात लागू करण्यात आला होता. त्यानुसार, अमेरिकी कर्मचाऱ्यांना चीनमध्ये अमेरिकी दूतावास आणि पाच वाणिज्य दूतावासांमध्ये सुरक्षा रक्षक आणि अन्य सहायक कर्मचारी म्हणून काम करत असलेल्या चीनी नागरिकांसोबत प्रेमसंबंध अथवा शारीरिक संबंध ठेवण्यावर बंदी घालण्यात आली होती.

सरकारी कर्मचाऱ्यांना चीनी नागरिकांशी शरीरसंबंध ठेवता येणार नाही, अमेरिकी सरकारचा निर्णय
Donald Trump: ट्रम्प यांचा भारताला मोठा झटका! टॅरिफमध्ये २६ टक्क्यांनी वाढ; तेल, फोन,सोन्याच्या किंमती महागणार

अशा प्रकारच्या नियमावर गेल्या वर्षी पहिल्यांदाच चर्चा झाली होती, अशी माहिती सूत्रांनी वृत्तसंस्थेला दिली. चीनमधील बिजिंग दूतावास, तसेच गुआंगझू, शांघाय, शेनयांग आणि वुहान येथील वाणिज्य दूतावासासह हाँगकॉंगमधील अमेरिकी वाणिज्य दूतावासातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी हा नियम लागू असणार आहे. मात्र, चीनच्या बाहेर तैनात अमेरिकी कर्मचाऱ्यांना हा नियम लागू नसेल, असेही सूत्रांनी सांगितले.

सरकारी कर्मचाऱ्यांना चीनी नागरिकांशी शरीरसंबंध ठेवता येणार नाही, अमेरिकी सरकारचा निर्णय
US News: अमेरिकेत ४१ देशांच्या नागरिकांना No Entry; ट्रम्प सरकारचा नवा आदेश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com