Manish Sisodia : मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर १० मार्चला सुनावणी

Manish Sisodia News : मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर 10 मार्च रोजी निर्णय येणार आहे.
Manish Sisodia
Manish SisodiaSaam Tv

Delhi Manish Sisodiya News : दिल्ली सरकारच्या नवीन अबकारी धोरणात झालेल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना दिल्लीच्या राऊस अ‌ॅव्हेन्यू न्यायालयाने सोमवारी ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर आज ४ मार्चला ही मुदत संपल्यानंतर न्यायालयात या प्रकरणी सुनावणी पार पडली.

Manish Sisodia
Accident News: अवैध मुरूम वाहणाऱ्या टिप्परची दुचाकीला धडक, नांदेडमधील पत्रकाराचा जागीच मृत्यू; घातपात असल्याचा संशय

आज झालेल्या सुनावणीत सीबीआयने सिसोदिया हे चौकशीत सहकार्य करत नसल्याने सीबीआय कोठडीत आणखी तीन दिवस वाढ करण्याची मागणी केली होती. सिसोदिया यांच्या वतीने वकील दयनकृष्णन आणि सिद्धार्थ अग्रवाल यांनी बाजू मांडली. त्यांनी सिसोदिया यांची पत्नी आजारी आहे अशी कारण सांगितली.

आज झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने आपला निर्णय सुरक्षित ठेवला आहे. तसंच या प्रकरणात सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर 10 मार्च रोजी निर्णय घेण्यात येणार आहे. दिल्ली सरकारच्या नवीन अबकारी धोरणात कथितपणे भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आप (AAP) सरकारवर सातत्याने केला जात होता. यामध्ये व्यापाऱ्यांना फायदा होईल असं अबकारी धोरण तयार करण्यात आल्याचा आरोप आहे. तसंच एका अधिकाऱ्याने देखील या सर्व प्रकरणात सिसोदिया यांचं नाव घेतलं आहे.

Manish Sisodia
Pakistani Tiktok Star : खळबळजनक! पाकिस्तानी टिकटॉकरचा MMS लीक, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर म्हणाली...

काय प्रकरण आहे?

दिल्ली (Delhi) सरकारने 2015 मध्ये फीड बॅक युनिट (FBU) ची स्थापना केली होती. त्यानंतर त्यात 20 अधिकाऱ्यांसोबत काम सुरू केले. फेब्रुवारी 2016 ते सप्टेंबर 2016 या कालावधीत फीड बॅक युनिटने राजकीय विरोधकांची हेरगिरी केल्याचा आरोप आहे.

युनिटने केवळ भाजपवरच नव्हे तर आपशी संबंधित नेत्यांवरही लक्ष ठेवले होते. एवढेच नाही तर युनिटसाठी एलजीकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही असा देखील आरोप करण्यात आला आहे.

सीबीआयने (CBI) 12 जानेवारी 2023 रोजी गुप्तचर विभागाला एक अहवाल सादर केला आणि भ्रष्टाचार प्रकरणी मनीष सिसोदिया आणि इतर अधिकार्‍यांवर गुन्हा नोंदवण्याची मागणी एलजीकडे केली. त्याला लेफ्टनंट गव्हर्नर विनय सक्सेना यांनी मंजुरी दिली. आता या प्रकरणी सीबीआयला गृह मंत्रालयाकडून गुन्हा नोंदवून तपास करण्याची परवानगी मिळाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com