New Rules : आजपासून 2021 वर्षामधील नवव्या महिन्याला सुरुवात होत आहे. आज १ सप्टेंबर आजपासून दैनंदिन जीवनाशी निगडीत आर्थिक व्यवहारामध्ये मोठे बदल होणार आहे. तसेच काही नवे नियम देखील लागू होणार आहेत. हे बदल GST रिटर्न, PF UAN शी आधार लिकिंग, राजधानी ट्रेन आणि काही बँकांच्या व्यवहारांच्या नियमात बदल होणार आहे. तसे बघता हे सर्व नियम सामान्य माणसांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहेत.
जाणून घ्या या नियमांबाबत...
जीएसटी कलेक्शनमध्ये झालेली घट बघता, सरकारने उशिरा कर भरणाऱ्यांवर कडक दंड आकरले जात आहे. सरकार GST धारकांनी GST भरण्यास विलंब केले तर 1 सप्टेंबरपासून निव्वळ करावर व्याज आकारणार आहे. या बरोबरच वस्तू आणि सेवा कर GST भरण्यास उशीर केल्यास त्यावर एकूण कर दायित्वावर व्याज आकारले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
हे देखील पहा-
या वर्षाच्या सुरुवातीला, अनेक उद्योगांनी GST भरण्यास विलंब केल्यामुळे तब्बल ४६ हजार कोटी रुपयांचे थकीत व्याज वसूल करण्याच्या दिशेने व्यक्त केली होती. व्याज एकूण दायित्वावर आकारण्यात आले आहे. १९ सप्टेंबर दिवशी GST दर आणि इतर मुद्द्यांवर सुधारणा करण्याकरिता परिषदेची बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये नुकसान भरपाई उपकर आणि नुकसान भरपाई देयक कमी करण्याचा विचार केला जाऊ शकणार आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ईपीएफओ ईपीएफ खात्याला आधार क्रमांक बरोबर पीएफ खाते आणि युनिव्हर्सल अकाउंट नंबर यूएएन ला जोडणे अनिवार्य केले जाणार आहे. हे लिंक करण्याकरिता शेवटची तारीख ३१ ऑगस्ट होती. म्हणजेच, जर तुम्ही काल पर्यंत आपल्या पीएफ खात्यात युनिवर्सल अकाउंट नंबर यूएएन नंबरशी लिंक केले नसेल, मात्र, तुमच्या खात्यात कंपनीच्या वतीने पैसे जमा होण्यास अडचणी निर्माण होऊ शकणार आहे.
PF UAN आणि आधार लिंक करण्याकरिता देण्यात आलेली तारीख याअगोदर २ वेळा वाढवण्यात आली आहे. पंजाब नॅशनल बँकेने १ सप्टेंबरपासून आपल्या बचत खात्यांवर व्याजदरात घट करण्यात येणार आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, वार्षिक २.९० टक्के व्याजदर देण्यात येणार आहे. बँकेच्या सर्व नवीन आणि जुन्या खातेधारकांना हा नियम लागू करण्यात येणार आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.