Navjot Singh Sidhu: 48 दिवसआधीच नवज्योत सिंग सिद्धू येणार तुरुंगाबाहेर, नेमकं प्रकरण काय?

Congress News : नवज्योत सिंग सिद्धू हे आज १ एप्रिल २०२३ रोजी तुरुंगातून बाहेर येणार आहे.
Navjot Singh Sidhu
Navjot Singh SidhuSaam TV
Published On

Navjot Singh Sidhu News :  काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांची 10 महिन्यांनंतर आज तुरुंगातून सुटका होणार आहे. रोड रेज प्रकरणी गेल्या वर्षी 19 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना एक वर्षाची शिक्षा सुनावली होती. आज सुटका झाल्यानंतर सिद्धू पटियाला तुरुंगाबाहेर मीडियाशी संवाद साधणार आहेत.

1988 सालच्या रोड रेज प्रकरणी नवज्योत सिंग सिद्धू यांना गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर ते गेल्या 10 महिन्यांपासून तुरुंगात होते. अखेर आज त्यांची सुटका होणार आहे. नवजोत सिंग सिद्धू यांच्या ट्विटर हँडलवरून ही माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

Navjot Singh Sidhu
LPG Price Reduced : नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात झाली गोड! एलपीजी सिलिंडर झाला खूपच स्वस्त...

शिक्षेच्या दोन महिन्यांपूर्वी सुटका

सिद्धूची शिक्षेच्या दोन महिने आधी सुटका होत आहे. त्याचे वकील एचपीएस वर्मा यांनी सांगितले की, पंजाब तुरुंगाच्या नियमांनुसार कैद्याची वर्तणूक चांगली असेल तर त्याला वेळेपूर्वी सोडले जाऊ शकते. कैद्याची वागणूक चांगली असेल तर त्याची शिक्षा दर महिन्याला ५ ते ७ दिवसांनी कमी होते. त्यामुळे सिद्धू यांची शिक्षा पूर्ण होण्याचा ४८ दिवसाआधीच तुरुंगातून बाहेर येणार आहे. (Congress News)

Navjot Singh Sidhu
Crime News : कामावर यायला उशिर झाला, मालकिणीने जाब विचारताच कामगाराने केलं संतापजनक कृत्य

नवज्योत सिंग सिद्धू भोगत असलेले रोड रेज प्रकरण आहे तरी काय?

दरम्यान, नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांना सुप्रीम कोर्टाने १९ मे रोजी एक वर्षांची शिक्षा दिली होती. नवज्योत सिंग सिद्धू यांचं हे प्रकरण १९८८ सालातील आहे. एकंदरित हे प्रकरण ३३ वर्ष जुनं आहे. सिद्धू यांना सुप्रीम कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर त्यांनी २० मे रोजी आत्मसमर्पण केलं होतं. गेल्या १० महिन्यांपासून सिद्धू तुरुंगात होते.

सिद्धू यांनी त्यांच्या मित्रासोबत एका ६५ वर्षीय व्यक्तीला मारहाण केली होती. कार पार्किंगवरून हा वाद झाला होता. सिद्धू यांच्या धक्काबुकीत ६५ वर्षीय गुरनाम सिंग खाली पडले होते. त्यानंतर रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.

तर गुरनाम सिंग यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे वृत्त समोर आले होते. या प्रकरणानंतर कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये सिद्धू आणि त्यांचे मित्र रुपिंदर यांच्या निर्दोष हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com