10 तासांच्या चौकशीनंतर राहूल गांधींची ED कडून सुटका; आता प्रियांका गांधींचा नंबर?

उद्याही गांधी यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.
 Rahul Gandhi News, Priyanka Gandhi News
Rahul Gandhi News, Priyanka Gandhi NewsSaam TV
Published On

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने काँग्रेस नेते (Congres) राहुल गांधी यांची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी केली. आज दुसऱ्या दिवशी तब्बल 10 दहा तास चौकशी केल्यानंतर राहूल गांधींची (Rahul Gandhi) सुटका केली. उद्याही गांधी यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहूल यांच्याबरोबरच ईडीकडून प्रियांका गांधी यांनाही चौकशीसाठी (ED Summons) बोलवण्यात येणार असल्याची चिन्हं आहे. (Congress Leaders Rahul Gandhi Latest Marathi News)

 Rahul Gandhi News, Priyanka Gandhi News
Breaking: अनिल परब यांना ईडीचे समन्स

दुसरीकडे, आज दुसऱ्या दिवशीही ठिकठिकाणी राहुल गांधींच्या ईडी चौकशीचा निषेध करत काँग्रेसने निदर्शनं केली. ईडीच्या समन्सला विरोध करणाऱ्या काँग्रेसचे (Congres) प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांच्यासह १०० हून अधिक नेत्यांना पोलिसांनी काँग्रेस कार्यालयाबाहेर ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी काँग्रेस कार्यालय आणि ईडी मुख्यालयाभोवती कलम १४४ लागू केले आहे. दरम्यान, आता प्रियांका गांधी यांनाही चौकशीला बोलावण्याची शक्यता आहे. (Priyanka Gandhi News)

काय आहे नॅशनल हेराल्ड केस?

1938 मध्ये काँग्रेसने असोसिएट जर्नल्स लिमिटेडची (AJL)स्थापना केली. असोसिएट जर्नल्स लिमिटेड अंतर्गत नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र आहे. 2012 साली भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्रायल कोर्टात याचिका दाखल करून आरोप केला होता की, काही काँग्रेस नेत्यांनी (राहुल-सोनिया गांधींव्यतिरिक्त) यंग इंडिया लिमिटेड मार्फत असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडचे ​​चुकीच्या पद्धतीने अधिग्रहण करण्यात आले आहे. 2000 कोटींची दिल्लीतील बहादूर शाह जफर मार्गावर असलेल्या हेराल्ड हाऊसची इमारत ताब्यात घेण्यासाठी हे सर्व केल्याचा आरोप स्वामी यांनी केला होता.

 Rahul Gandhi News, Priyanka Gandhi News
'जे काय करायचं ते रणांगण आल्यावर...'; धनंजय महाडिक यांच्या विजयानंतर सतेज पाटलांची प्रतिक्रिया

काय आहे संपूर्ण घटना

गांधी कुटुंबाने काँग्रेस पक्षाचा निधी वापरून एजेएल मिळवल्याचा आरोप स्वामी यांनी केला आहे. स्वामींच्या आरोपांवर विश्वास ठेवायचा असेल, तर असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडची 2000 कोटी रुपयांची मालमत्ता हस्तगत करण्याचा त्यांचा उद्देश होता.

2008 मध्ये नॅशनल हेराल्ड बंद होत असताना काँग्रेसचे असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडवर 90 कोटी रुपयांचे कर्ज होते. हे कर्ज पुन्हा वृत्तपत्र चालवण्यासाठी देण्यात आले. पण वृत्तपत्राचे चालवणे शक्य झाले नाही. आणि एजेएलला हे कर्ज काँग्रेसला परत करता आले नाही. यानंतर, 26 फेब्रुवारी 2011 रोजी, काँग्रेसने असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडचे ​​90 कोटी रुपयांचे दायित्व ताब्यात घेतले. याचाच अर्थ पक्षाने 90 कोटींचे कर्ज दिले होते.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com