मी नारायण तातू राणे.. नारायण राणेंनी घेतली केंद्रीय मंत्रीपदाची शपथ

2019 मध्ये दुसरा कार्यकाळ सुरु झाल्यापासून मोदींच्या मंत्रीमंडळातील हा पहिला सर्वात मोठा विस्तार आहे
मी नारायण तातू राणे.. नारायण राणेंनी घेतली शपथ
मी नारायण तातू राणे.. नारायण राणेंनी घेतली शपथ Twitter/@BJPIndia
Published On

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार सुरू झाला. सर्वात प्रथम भाजपाचे नेते नारायण राणे यांनी शपथ घेतली. त्यांच्या शपथविधी झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांसह पक्षात मोठा जल्लोष दिसून येत आहे. 2019 मध्ये दुसरा कार्यकाळ सुरु झाल्यापासून मोदींच्या मंत्रीमंडळातील हा पहिला सर्वात मोठा विस्तार आहे. (I am Narayan Tatu Rane .. Narayan Rane was sworn in as a Union Minister)

मी नारायण तातू राणे.. नारायण राणेंनी घेतली शपथ
हे 43 मंत्री घेणार मंत्रिपदाची शपथ; वाचा सविस्तर

महाराष्ट्रातील वजनदार नेते म्हणूल नारायण राणे हे एक नाव आहे. कोकणातील सर्वांत जास्त जनपाठिंबा असलेले नेते, उत्तम संघटन कौशल्य, आक्रमक भाषाशैली, आणि महाराष्ट्रातील ताकदीचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. नारायण राणे यांच्यावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मोठा प्रभाव आहे. 1985 मध्ये त्यांनी शिवसेनच्या टिकीटावरुन मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला.

1999 मध्ये मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. मात्र त्यांच्यावर आरोप झाल्याने त्यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं. मनोहर जोशी सरकारच्या काळात नारायण राणे यांच्याकडे महसूल खाते, दुग्धविकास, पशू संवर्धन आशा विविध खात्यांचा कारभार होता. त्यानंतर शिवसेनेचा खंदा, अभ्यासू, आक्रमक आणि कष्टाळू नेते असलेल्या नारायण राणे मुख्यमंत्री पदी विराजमान झाले. मात्र केवळ आठ महिनेच नारायण राणे मुख्यमंत्री पदावर राहिले. राज्यातील 1999 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने बहुमत मिळवत आपली सत्ता स्थापन केली.

दरम्यान, २०२४ च्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका आणि विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या जिंकण्याच्या दृष्टिकोनातून भाजपने ही रणनीती आखलेली दिसत आहे.

Edited By - Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com