'त्या' संशयित दहशतवाद्यांचे नांदेड कनेक्शन; पाकिस्तानातून पाठवलेले लोकेशन

करनालमधून अटक केलेल्या चारही दहशतवाद्यांचे कनेक्शन महाराष्ट्रातील नांदेडशी असल्याचे उघड झाले आहे.
Karnal's terrorist connection with Nanded In Maharashtra, Nanded latest Marathi news
Karnal's terrorist connection with Nanded In Maharashtra, Nanded latest Marathi newsSAAM TV

करनाल: हरयाणाच्या करनालमध्ये दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. देशात मोठ्या घातपाताचा खलिस्तानी दहशतवाद्यांचा कट उधळून लावला आहे. करनालमधून चार दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला आहे. हा साठा आरडीएक्सचा असू शकतो, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्याकडून तीन आयईडी बॉम्बही जप्त करण्यात आले आहेत. हे चारही संशयित दहशतवाद्यांचे महाराष्ट्रातील (Maharashtra) नांदेड कनेक्शन समोर आले आहे. ते सर्व जण नांदेडला (Nanded) जात होते. त्याआधीच त्यांना अटक करण्यात आली. हे चौघेही आयईडी तेलंगणात पाठवणार होते. जिथे स्फोटकं नेण्यात येत होती, ते लोकेशन त्यांना पाकिस्तानमधून पाठवण्यात आले होते. या दहशतवाद्यांनी यापूर्वी दोन ठिकाणी आयईडी पाठवले आहेत, अशी माहितीही उघड झाली आहे. (Karnal's terrorist connection with Nanded)

रिपोर्टनुसार, अटक केलेल्या चारही संशयित दहशतवाद्यांचा संबंध दहशतवादी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनलशी (BKI) आहे. पंजाब पोलिसांच्या आयबीचे पथक आणि हरयाणा पोलिसांनी (Haryana) ही संयुक्त कारवाई केली. संशयित दहशतवाद्यांच्या कारमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा सापडलेला आहे. त्यामुळे या कारची तपासणी ही रोबोटच्या मदतीने केली. हे संशयित दहशतवादी मोठा घातपात करण्याच्या तयारीत होते, अशी माहिती समोर आली आहे.

ड्रोनच्या माध्यमातून पाकिस्तानातून आणलेला शस्त्रसाठा

करनालचे पोलीस अधीक्षक गंगाराम पुनिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरप्रीत, अमनदीप, परमिंदर, भूपिंदर अशी अटक केलेल्या संशयित दहशतवाद्यांची नावे आहेत. खलिस्तानी दहशतवादी रिंडा याने ड्रोनच्या मदतीने पाकिस्तानहून फिरोजपूरमध्ये शस्त्र पाठवले होते. यातील तीन फिरोजपूर आणि एक लुधियानाचा रहिवासी आहे. मुख्य आरोपी असलेल्या दहशतवाद्याची (Terrorist) इतरांशी तुरुंगात ओळख झाली होती.

Karnal's terrorist connection with Nanded In Maharashtra, Nanded latest Marathi news
मोठ्या घातपाताचा कट उधळला; करनालमधून ४ संशयित दहशतवादी अटकेत

महाराष्ट्रातील नांदेड कनेक्शन

संशयित दहशतवादी महाराष्ट्रातील नांदेडला जात होते. आयईडी ते तेलंगणात पाठवणार होते. ज्या ठिकाणी ही स्फोटके नेण्यात येणार होती, तिथले लोकेशन हे पाकिस्तानमधून पाठवण्यात आले होते, अशी माहिती समोर आली आहे. अटक केलेल्या चारही दहशतवाद्यांचे वय २० ते २५ आहे. हे सर्व जण हरविंदर सिंह उर्फ रिंडाशी संबंधित होते. रिंडा हा वॉन्टेड असून, सध्या तो पाकिस्तानात लपल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, करनालच्या बसताडा टोलजवळून पोलिसांनी चार जणांना कारमधून ताब्यात घेतले. सध्या ही कार मधुबन पोलीस ठाण्यात आहे. तिथं बॉम्बनाशक पथक तैनात आहे. वरिष्ठ अधिकारीही तिथे पोहोचले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com