Myanmar Military Attacks : मोठी बातमी! म्यानमारमध्ये हवाई हल्ल्यात १०० जणांचा मृत्यू; मृतांमध्ये लहान मुलांसह पत्रकारांचा समावेश

दरम्यान या दुर्घटनेमध्ये लहान मुलं, पत्रकार यांच्यासह १०० व्यक्तींचा मृत्यू झाल्याचे समजले आहे.
Myanmar Military Attacks
Myanmar Military AttacksSaam TV
Published On

Myanmar News : म्यानमारमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. मंगळवारी मध्य म्यानमारमध्ये लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यात १०० व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. लष्करी राजवटीच्या विरोधकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी येथे मोठ्या संख्येने व्यक्ती जमल्या होत्या. दरम्यान या दुर्घटनेमध्ये लहान मुलं, पत्रकार यांच्यासह १०० व्यक्तींचा मृत्यू झाल्याचे समजले आहे.

बीबीसी बर्मीज, रेडिओ फ्री एशिया (आरएफए) आणि इरावडी न्यूज पोर्टल या माध्यम संस्थेमधील काही पत्रकारांचा यात मृत्यू झाला आहे.

Myanmar Military Attacks
Viral News: चित्तथरारक! स्टंटबाजीच्या नादात कारच्या चाकाखाली आलं डोकं, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO VIRAL

तेथे उपस्थित व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ८ वाजता १५० व्यक्ती या ठिकाणी सभेसाठी जमा झाल्या होत्या. त्यामवेळी सैन्याकडून या ठिकाणी बॉम्ब टाकण्यात आला. या हल्ल्यात १०० व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तींमध्ये विरोधी गटातील नेत्यांचाही समावेश आहे.

स्थानिक माध्यमांवर दिलेल्या माहितीनुसार, सदर घटना घडली त्या गावात पिपल्स डिफेन्स फोर्स कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पिपल्स डिफेन्स फोर्स ही संघटना सरकार विरोधी काम करत आहे. साल २०२१ पासून ही संघटना म्यानमारमध्ये आपले वर्चस्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे म्यानमार सैन्याने या घटनेसाठी सरकारविरोधी संघटना जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

Myanmar Military Attacks
UP Bride Firing Video : एका झटक्यात खेळ खल्लास...; नवरीने लग्न मंडपातच झाडल्या धाडधाड गोळ्या, पाहा VIRAL VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com