Mukhtar Ansari : स्वातंत्र्यलढ्यात कुटुंबाचं योगदान, हुशार, फूटबॉलची आवड; सुसंस्कृत घरातील मुलगा मुख्तार अन्सारी कसा बनला माफीया डॉन?

Mukhtar Ansari News : गाझीपूर जिल्ह्यातील युसूफपूर मुहम्मदाबाद शहरात 1963 मध्ये मुख्तार अन्सारी यांचा जन्म झाला होता. शहरात अन्सारी कुटुंबाची मोठी प्रतिष्ठा होती. स्वातंत्र्यलढ्यात या कुटुंबाने दीर्घकाळ योगदान दिलं आहे. त्यामुळे अन्सारी कुटुंबाचं नाव आदराने घेतलं जायचं.
Mukhtar Ansari
Mukhtar AnsariSaam Digital

Mafia Don Mukhtar Ansari

मुख्तार अन्सारी... उत्तर प्रदेशच नाही तर संपूर्ण देशात माफीया डॉनमधलं पहिलं नावं. जाडजूड मिश्या, भारदस्त शरीरयष्ठी, खळखळून हसणं, आवाज असा की कितीही मोठी व्यक्ती असली तरी थरथरायची, डोळे असे की समोरच्याला घाम फुटायचा. स्वताचा दबदबा कायम ठेवण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी यातूनच मुख्तार माफीया डॉन बनला. एका सुसंस्कृत आणि खानदानी कुटुंबात वाढलेल्या मुख्तारला संगत, आजूबाजूचा माहोल आणि बरोजगार तरुणांनी माफीया क्षेत्रात शिखरावर नेवून ठेवलं. जोपर्यंत सरकारमधल्या शक्तींचा हात होता तोपर्यंत हा दरारा कायम राहिला, या शक्तींनी डोक्यावरून हात काढला आणि दिवस फिरले. माफीया डॉनचा तो दरारा हळूहळू कमी होऊ लागला आणि परतीचे सर्व दोर कापले गेले.

कधी काळी माफीया क्षेत्रात सर्वोच्च शिखरावर असलेल्या मुख्तार अन्सारीची काल बांदा तुरुंगात प्रकृती बिघडली होती. त्याला ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्याला बांदा येथील राणी दुर्गावती वैद्यकीय महाविद्यालयात तातडीने दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. कारागृहात त्याला विष दिल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. आता या प्रकरणाची सर्व चौकशी सुरू झाली असून एक महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गाझीपूर जिल्ह्यातील युसूफपूर मुहम्मदाबाद शहरात 1963 मध्ये मुख्तार अन्सारी यांचा जन्म झाला होता. शहरात अन्सारी कुटुंबाची मोठी प्रतिष्ठा होती. स्वातंत्र्यलढ्यात या कुटुंबाने दीर्घकाळ योगदान दिलं आहे. त्यामुळे अन्सारी कुटुंबाचं नाव आदराने घेतलं जायचं. घरची माणसं सुशिक्षित आणि सुस्कृत होती, त्यामुळे लहान लहान समस्या घेऊन लोक मुख्तारच्या घरी यायचे. ज्याला फाटक किंवा बडका फाटक म्हणतात. मुख्तार त्यांच्या कुटुंबात सर्वात उंच होता. तो व्हॉलीबॉल, क्रिकेट आणि फुटबॉल खेळायचा, पण सामना जिंकण्यावरच त्याचं लक्ष असायचं. अभ्यासातही तो हुशार होता.

बातमी अपडेट होत आहे....

Mukhtar Ansari
Mafia Don Mukhtar Ansari : मोठी बातमी! माफिया डॉन मुख्तार अन्सारीचं निधन, तुरुंगात आला होता हार्ट अटॅक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com