Kanpur News
Kanpur NewsSaam Tv

Kanpur News : आई-मुलीला जिवंत जाळलं; प्रशासन पाहतच राहिले अन् लोक व्हिडिओ बनवत राहिले; मन सुन्न करणारी घटना

या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे.

Kanpur Latest News : उत्तर प्रदेशातील कानपूर देहाटच्या मैथा तहसील भागातील मदौली पंचायतीच्या चल्हा गावातील अतिक्रमण हटवण्यासाठी पोहोचलेल्या पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पथकासमोरच एका झोपडीला संशयास्पद स्थितीत आग लागली. आपले घर जळत असल्याचे पाहून आई व मुलगी झोपडीत शिरले. या घटनेत आग लागून आई-मुलीचा मृत्यू झाला. 

Kanpur News
Pappu Yadav Accident : पप्पू यादव यांच्या ताफ्यातील गाड्यांचा भीषण अपघात, 2 कार चक्काचूर, 11 नेते जखमी

या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. दोघींना वाचविण्यासाठी गेलेला पतीही या आगीत गंभीर भाजला गेला. या धक्कादायक घटनेने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांसह पोलिसांना (Police) गावातून पळवून लावले. पथकाने देखील आपला जीव कसाबसा वाचवला.

दोन्ही मृतांचे मृतदेह घटनास्थळावरून बाहेर काढण्यात आले आहेत. मृतदेहाची अवस्था पाहून सर्वांचेच हृदय हेलावले. दोन्ही मृतदेहांची अवस्था पाहून तेथे उपस्थित असलेले सर्वजण हादरले.

नेमकं काय घडलं?

कानपूर (Kanpur) देहाटच्या मैथा तहसील भागातील मदौली गावात सरकारी जमिनीवरील अवैध अतिक्रमण हटवण्यासाठी प्रशासन गेले होते. ज्या घराची मोडतोड केली जात आहे, त्या घरात राहणाऱ्या लोकांनी विरोध केला. लोकांनी आत्महत्या करण्याची धमकीही दिली. यादरम्यान अचानक आग लागली. झोपडीचा जो भाग पेटला होता तो वाचवण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बुलडोझरच्या सहाय्याने उरलेला भाग काढण्याचा प्रयत्न केला, मात्र यादरम्यान तो भागही तुटून जळत्या झोपडीवर पडला.

Kanpur News
Yashomati Thakur News: वीज कनेक्शन कट केले तर अधिकाऱ्यांना झोडा; यशोमती ठाकूर यांचा शेतकऱ्यांना अजब सल्ला

भीषण आगीच्या भक्ष्यस्थानी आई व मुलगी आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर प्रशासकीय अधिकारी त्यांची गाडी सोडून पळून गेल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्याचवेळी अपघातात जीव गमावलेल्या आई-मुलीचे मृतदेह बाहेर काढले असता ते पूर्णपणे जळाले होते. त्याची ओळख पटवणेही अवघड होते. हे दृश्य पाहून उपस्थित सर्वांचे डोळे भरून आले.

दरम्यान, या घटनेने संपूर्ण गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले झाले. रात्री उशीरा बारा वाजेपर्यंत ग्रामस्थांनी गोंधळ घातला. घटनास्थळी कानपूरचे आयुक्त राज शेखर, डीएम नेहा जैन, एडीजी आलोक कुमार आणि इतर अधिकारी उपस्थित होते. राज्यमंत्री प्रतिभा शुक्लाही रात्री उशिरा घटनास्थळी पोहोचल्या होत्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com