Marathi News Live Updates : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, पाणीटंचाईपासून काहीसा दिलासा

Modi oath-taking ceremony LIVE updates : केंद्रात एनडीएच सरकार बनत असून नरेंद्र मोदी आज सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती द्रौपती मुर्मू सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी शपथ देतील.
Narendra Modi Oath Ceremony LIVE
Narendra Modi Oath Ceremony LIVE Saam

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, पाणीटंचाईपासून काहीसा दिलासा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये रविवारी रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली. विजेच्या कडकडाटसह जोरदार पाऊस बरसला. सायंकाळी बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस बरसला. या पेरणीपूर्व पावसामुळं संभाजीनगर जिल्ह्याला मोठा दिलासा मिळणार आहे. कारण विहिरी, तलाव प्रकल्प कोरडे पडल्याने पाण्यासाठी वणवण करावी लागतेय. या पावसामुळे थोडासा दिलासा मिळेल असं चित्र आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांना यंदा पेरणी लवकर करता येईल अशी आशा निर्माण झाली आहे. मात्र असाच पाऊस राहिला तर तो दिलासा शेतकऱ्यांना मिळेल.

Pankja Munde : पंकजा मुंडेंचा पराभव जिव्हारी, बीडच्या डिघोळअंबा येथील ऊसतोड कामगार युवकाची आत्महत्या

पंकजा मुंडे यांचा लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव जिव्हारी लागल्याने, बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळअंबा येथील ऊसतोड कामगार युवक पांडुरंग रामभाऊ सोनवणे वय 33 याने आत्महत्या केलीय. लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतरच पांडुरंग आत्महत्या करण्यासाठी निघाला होता. मात्र गावचे सरपंच व इतरांनी त्याची समजूत काढली होती.

Terrorist Attack In Reasi: जम्मू-काश्मीरमधील शिव खोडीमधून परत येणाऱ्या बसवर दहशतवादी हल्ला

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी शिव खोडीवरून परतणाऱ्या बसवर हल्ला केलाय. या बसमध्ये 40 ते 50 प्रवासी होते. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, दहशतवाद्यांनी या बसवर 40 ते 50 राऊंड गोळीबार केला. ज्यामध्ये एक गोळी बस चालकालाही लागलीय. बस चालकाला गोळी लागल्याने बस खोल दरीत कोसळली. या हल्ल्यात अनेकांचा बळी गेल्याची माहिती आहे.

Modi Oath Ceremony :मोदींनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ; पुण्यात जल्लोष

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयाबाहेर जल्लोष करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटके फोडत आणि ढोल ताश्यांच्या गजरात जल्लोष केला. आज आमच्यासाठी दिवाळी आहे अशी भावना त्यांनी बोलून दाखवली.

Pune BJp  Celebration: पुण्यातील एस पी कॉलेज चौकात भाजपकडून जल्लोषाची तयारी सुरू

एस पी कॉलेज चौकात बँड पथकाकडून वादन सुरू आहे. पुणे शहर भाजपकडून १०० किलो जिलेबी वाटप होणार आहे. शपथविधी होताच फटाक्यांची आतषबाजी केली जाणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने पुण्यात जल्लोष केला जाणार आहे. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांची केंद्रीय मंत्री पदी निवड झाल्याबद्दल पुणे शहर भाजपच्या वतीने विजयोत्सव केला जाणार आहे.

T20 मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा विजय व्हावा म्हणून क्रिकेट प्रेमीकडून होम

अमेरिकेत होत असलेल्या T20 वर्ल्ड कप मधील भारत पाक सामन्यात भारताला दंनदनीत विजय मिळावा म्हणून पुण्यातील सहकर नगर भागातील शाहू मैदानावर होम हवन करण्यात आले. यावेळी क्रिकेट प्रेमी आणि क्रिकेटर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

NCP  News: धीरज शर्मा यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती

मला सांगायला आनंद होत आहे की धीरज शर्मा यांची नियुक्ती युवक राष्ट्रीय अध्यक्ष पदी केली आहे. आज दिल्लीत मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी दिलीय.

Modi oath-taking ceremony LIVE updates : 'स्वप्नातही वाटलं नव्हत मंत्रिपद मिळेल', मुरलीधर मोहोळ यांची पहिली प्रतिक्रिया

पुणेकरांची जशी सेवा केली तशी देशाची सेवा करायची आहे

स्वप्नातही वाटलं नव्हत मंत्रिपद मिळेल अस... पण अचानक फोन आला आणि सांगितल तुम्हाला शपथ घ्यायची आहे

मोदींनी आज मार्गदर्शन केलं... सगळे नव्याने मंत्री बनणारे उपस्थित होते... आगामी काळात काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत

चांगल काम करून पुण्याचं नाव करू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com