ऑनलाइन क्लासदरम्यान झाला मोबाइलचा स्फोट; अन् घडलं असं काही
ऑनलाइन क्लासदरम्यान झाला मोबाइलचा स्फोट; अन् घडलं असं काहीSaam Tv

ऑनलाइन क्लासदरम्यान झाला मोबाइलचा स्फोट; अन् घडलं असं काही

कोरोना महामारी सुरू झाल्यापासून शाळा कॉलेज आणि कोचिंग क्लासेसने ऑनलाइन (Online) क्लासेस सुरू झाले.
Published on

वृत्तसंस्था : कोरोना महामारी सुरू झाल्यापासून शाळा कॉलेज आणि कोचिंग क्लासेसने ऑनलाइन (Online) क्लासेस सुरू केले आहेत. विद्यार्थी (Student) घरात बसून मोबाईल (Mobile) किंवा कॉम्प्युटरवर ऑनलाइन अभ्यास करू लागले आहेत. आजही बऱ्याच ठिकाणी ऑनलाइन क्लास सुरू आहेत. पण, याच ऑनलाइन क्लास दरम्यान एका मोबाईलचा स्फोट (Explosion) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

हे देखील पहा-

मध्य प्रदेश (Madhya Pradesh) मधील सतना (Satna) या ठिकाणी ऑनलाइन क्लास सुरू असताना मोबाईलचा स्फोट झाला. या घटनेमध्ये आठवीतील विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाली आहे. स्फोटामुळे मुलाच्या एका हाताला आणि चेहरा गंभीररित्या भाजले आहे. यानंतर कुटुंबियांनी त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला जबलपूर (Jabalpur) मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले आहे.

रामप्रकाश भदौरिया (वय-१५)असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. हा सतना येथील चांदकुईया (Chandkuiya) गावातील एका खासगी शाळेत आठवीच्या वर्गात शिकत होता. फोनवर ऑनलाइन क्लास सुरू होता. तेवढ्यात मोबाईलचा मोठा स्फोट झाला. यामुळे विद्यार्थ्याच्या तोंडातून आणि नाकातून रक्तस्त्राव सुरु झाला. त्याच्या हाताला देखील दुखापत झाली आहे. स्फोटाचा आवाज ऐकून कुटुंबीय आले आणि त्यांनी जखमी विद्यार्थ्याला नागौड येथील आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले आहे.

ऑनलाइन क्लासदरम्यान झाला मोबाइलचा स्फोट; अन् घडलं असं काही
प्रेम प्रकरणात आला जमिनीचा वाद; प्रेयसीनं प्रियकराला संपवल आणि मृतदेह...

प्राथमिक उपचारानंतर त्याला सतना जिल्हा रुग्णालयामध्ये (hospital) रेफर करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयात देखील विद्यार्थ्याच्या प्रकृतीत फारशी सुधारणा झाली नाही. त्याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला लगेच जबलपूर मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले आहे. मोबाईलच्या स्फोटामध्ये विद्यार्थ्याच्या तोंडाला आणि नाकाला पूर्णपणे मार लागल्याचे डॉक्टरांचे सांगणे आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com