Haryana Crime News : पाऊस आल्याने दुकानाबाहेर उभी राहिली, विद्यार्थिनीवर सलूनचालकाची नजर पडली, अन्...

Haryana Crime News : फरिदाबादच्या बल्लभगड भागात ही घटना घडली आहे.
 Crime News
Crime NewsSaam tv

Haryana News : हरियाणाच्या गुडगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चाकूचा धाक दाखवून विद्यार्थीनीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. एका सलून चालकाने हे दुष्कृत्य केलं आहे. फरिदाबादच्या बल्लभगड भागात ही घटना घडली आहे.

29 मे रोजी पीडित विद्यार्थिनी शाळेतून घरी येत होती. मात्र वाटेत अचानक पाऊस आल्याने मुलगी पावसापासून वाचण्यासाठी एका सलूनच्या बाहेर उभी होती. त्यावेळी आरोपी सलून चालकाची नजर विद्यार्थिनीवर पडली. आरोपीने तिला आत ओढले आणि चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. (Crime News)

 Crime News
Nagpur News : 3 वर्षानंतर सुरु झालेल्या स्विमिंग पूलमध्ये बुडून डॉक्टरचा मृत्यू; नागपूरमधील घटना

आईच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल

याप्रकरणी आरोपी सलून चालक प्रवीण याला पोलिसांनी अटक केली आहे. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले गेले आणि त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. (Latest News)

 Crime News
CCTV Footage: साक्षात 'देव' धावून आला! महिला RPF कॉन्स्टेबलने वाचवले महिला प्रवासाचे प्राण, VIDEO व्हायरल

जामीनावर होता बाहेर

प्रवीणने यापूर्वीही बल्लभगढ परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता. त्याच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या आरोपी जामिनावर तुरुंगाबाहेर होता. पोलिसांनी त्याच्याकडून चाकू आणि मोटरसायकल जप्त केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com