Weather Alert: कडाक्याचा उन्हाळा करणार हैराण; 8 राज्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा

राजस्थानमध्ये तापमान ४२ अंश सेल्सिअसच्या आसपास
Weather Alert
Weather AlertSaam Tv

नवी दिल्ली - हवामानात ज्याप्रकारे बदल होताना दिसत आहेत, त्यावरून यंदा उन्हाळ्याच्या तडाख्याने नागरिकांना चांगलाच त्रास होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. हवामानातील बदलाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने येत्या काही दिवसांत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतातील बहुतांश भागात तापमान वाढले आहे. त्यामुळे आठ राज्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. यासोबतच पश्चिम आणि पूर्व राजस्थानच्या काही भागात हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

हवामान खात्यानुसार, गुजरात , जम्मू, हिमाचल प्रदेश, ओडिशा, पश्चिम मध्य प्रदेश, विदर्भ आणि तेलंगणामध्ये १७ मार्चपासून उष्णतेची लाट आणखी तीव्र होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे वायव्य भारतातील बहुतांश भागात पुढील दोन दिवस कमाल तापमानात कोणताही बदल होणार नाही.

हे देखील पहा -

राजस्थानमध्ये तापमान ४२ अंश सेल्सिअसच्या आसपास

राजस्थानमध्ये उष्णतेनं नागरिक हैराण झाले आहेत. येथे अनेक ठिकाणी तापमान ४२ अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचले असून हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. जयपूर हवामान केंद्रानुसार, गेल्या २४ तासांत राज्यातील सीमावर्ती शहर बारमेरमध्ये ४२.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली, जी सरासरीपेक्षा ७.५ अंश जास्त आहे. याशिवाय बांसवाडामध्ये ४२.४, डुंगरपूरमध्ये ४२.३, जैसलमेरमध्ये ४२.०, फलोदीमध्ये ४१.९, नागौरमध्ये ४१.३ आणि बिकानेरमध्ये ४१.२ अंश तापमान होते. राज्याच्या बहुतांश भागात दिवसाचे तापमान ४० अंश सेल्सिअसच्या आसपास आहे.

Weather Alert
Barshi: हुतात्मा रामेश्वर काकडे यांना गौडगावात साश्रुपुर्ण नयनांनी निराेप

हवामान खात्याने अनेक भागात ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे

हवामान विभागाने गुरुवारी सीमावर्ती बाडमेर आणि जैसलमेर जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर शुक्रवारी बाडमेर, जैसलमेर, जोधपूर, जालोर आणि पाली जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागानुसार, १९ मार्चपासून तापमानात किंचित घट झाल्याने कमाल तापमान ४० अंशांच्या खाली जाण्याची शक्यता असून, राज्यातील उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com