सावधान! कोरोनापेक्षाही घातक Marburg Virus चे संशयित रुग्ण आढळले, WHO कडूनही Alert

या व्हायरसपासून सावध राहा असा इशारा WHO ने दिला आहे.
Marburg Virus
Marburg VirusSaam Tv

नवी दिल्ली : देशात कोरोना महामारीचे प्रकरण काही प्रमाणात कमी झाले असले तरी संकट अजूनही टळलेलं नाहीये. अजूनही जगातील बहुतांश देश या आजाराशी दोन हात करत आहेत. त्यातच स्वाइन फ्लू, मंकीपॉक्स अशा प्रकारचे व्हायरसही डोके वर काढत आहेत. अशातच पुन्हा एकदा एका नवीन व्हायरसने दहशत निर्माण केली आहे. हा नवीन व्हायरस कोरोना पेक्षाही घातक असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हायरसपासून सावध राहा असा इशारा WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. (Marburg Virus Marathi News)

Marburg Virus
India Corona Update: देशात कोरोनाचे 13,615 नवीन रुग्ण; सक्रिय रुग्णांची संख्या 1.31 लाखांच्या पुढे

विशेष बाब म्हणजे, नव्याने आढळून आलेल्या मारबर्ग या व्हायरसची याआधीही काही प्रकरणं समोर आली होती. WHO च्या माहितीनुसार, 1967 मध्येही या व्हायरसची सर्वाधिक प्रकरणं आढळली होती. तेव्हापासून दक्षिण आणि पूर्व आफ्रिकेत या व्हायरसचा बऱ्याचदा उद्रेक झाला आहे.

मारबर्ग हा व्हायरसच इबोला व्हायरसपेक्षाही कित्येक पटीने धोकादायक आहे. किती तरी वेगाने पसरून तो लोकांना आपल्या विळख्यात घेतो. जर कुणी या व्हायरसच्या विळख्यात सापडलं तर त्याचा मृत्यू निश्चित आहे, असंही सांगितलं जातं. यामुळे होणारा मृत्यूदर हा 24 ते 88 टक्के आहे. यावरूनच याचा संसर्गाचा वेग किती आहे, याचा अंदाज लावता येतो. (Marburg Virus Latest News)

Marburg Virus
रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर! सरकारने केली मोठी घोषणा

दरम्यान, ICMR चे माजी महासंचालक एन.के. गांगुली यांनी सांगितलं की, मारबर्ग हा व्हायरस एका व्यक्तीमार्फत दुसऱ्यापर्यंत पसरू शकतो. एकमेकांच्या संपर्कात आल्याने किंवा स्पर्ष झाल्याने या व्हायरसचा प्रसार होतो. मारबर्ग हा इबोला व्हायरसशी संबधित व्हायरस आहे. या व्हायरसची लक्षणे फ्लूसारखी असतात. कोरोना व्हायरसने दहशत निर्माण केल्याने लोकं या आजाराबाबत अधिक सतर्क झाले आहेत.

सुदैवाने सध्यातरी या व्हायरसचे आक्रिकाबाहेरील देशात प्रकरणे सापडले नाहीत. तरी सुद्धा या व्हायरसबाबत लोकांनी सतर्क राहिलं पाहिजे असं तज्ञांचं म्हणणं आहे. मार्कबग व्हायरसवर सध्या कोणतंही अँटिव्हायरल औषध किंवा लस नाही.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com