Manipur : तणावानंतर मणिपूरमध्ये ५ दिवस इंटरनेट सेवा बंद; ३ दिवस शाळाही राहतील बंद

Manipur : मणिपूरमध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर मंगळवारपासून ५ दिवस इंटरनेट बंद करण्यात आलीय. बुधवार ते शुक्रवारपर्यंत शाळा देखील बंद राहणार आहेत.
Manipur
Manipur Saam Tv
Published On

Internet shutdown In Manipur:

मणिपूरमधील तणावामुळे मंगळवारपासून ५ दिवस इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीय. ही इंटरनेट सेवा १ ऑक्टोबर रविवारच्या रात्री ८ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. दरम्यान पाच महिन्यांआधीच राज्यात इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली होती. याशिवाय राज्यातील सर्व शाळाही तीन दिवस बंद राहणार आहेत. राज्य सरकारने बुधवार आणि शुक्रवारीपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर केलीय. प्रेषित मोहम्मद यांच्या जयंती ईद-ए-मिलादनिमित्त २८ सप्टेंबर रोजी राज्यात शासकीय सुट्टी असणार आहे. (Latest News)

२५ सप्टेंबर रोजी मणिपूरमधून बेपत्ता झालेल्या २ विद्यार्थ्यांच्या मृतदेहांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाली. हे विद्यार्थी जुलैपासून बेपत्ता होते. या दोघांची फिजम हेमजीत (२०) आणि हिझाम लिंथोईंगंबी (१७) अशी नावे आहेत. या दोघांच्या मृतदेहांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर इम्फाळमधील शाळा आणि महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी निषेध रॅली काढली. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यात ३० हून अधिक विद्यार्थी जखमी झाले. त्यामुळे राज्यात पुन्हा तणाव वाढलाय.

राज्यातील तणावादरम्यान, मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी लोकांना दिले की, दोन्ही विद्यार्थ्यांच्या हत्येप्रकरणातील दोषींना पकडण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार एकत्रितपणे काम करत आहे. विद्यार्थ्यांच्या हत्येच्या तपासाला अधिक गती देण्यासाठी सीबीआयचे संचालक एका विशेष पथकासह उद्या सकाळी विशेष विमानाने इम्फाळला पोहोचतील." त्यांची उपस्थिती हे प्रकरण जलदगतीने सोडवण्याची आमची वचनबद्धता दर्शवते. मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सतत संपर्कात आहे. जेणेकरून गुन्हेगारांना शोधून त्यांना न्याय मिळवून देऊ, असंही एन बिरेन सिंग म्हणालेत.

Manipur
#shorts : Beed Ncp Sabha : Manipur Violence : मणिपूर प्रकरणावरून Jayant Patil आक्रमक!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com