भारतविरोधी भूमिकेवरून मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांची जगभरात चर्चा झाली. भारताचं सैन्यही माघारी बोलावण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र आता संसदीय निवडणुकीसाठी मतदान सुरू झालं आहे. या निवडणुकीत भारतविरोधी भूमिका आणि चीनशी जवळीक राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांना भोवण्याची शक्यता आहे. राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्यासमोर निवडणुकीत अध्यक्ष मोहा यांच्या नेतृत्वाखालील मालदीव डेमोक्रॅटिक पार्टीचं कडवं आव्हान असणारं आहे.
मालदीवमध्ये संसदीय निवडणुकीसाठी मतदान सुरू झालं आहे. राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्यासाठी ही निवडणूक लिटमस टेस्टपेक्षा कमी नाही. लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात 600 हून अधिक मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. संसदेच्या 93 जागांसाठी सात राजकीय पक्षांचे 368 उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीत अध्यक्ष मोहा यांच्या नेतृत्वाखालील मालदीव डेमोक्रॅटिक पार्टी आणि पीपल्स नॅशनल काँग्रेस यांच्यात कडवी लढत होणार आहे. संसदीय निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांना चीनशी जवळीक भोवण्याची शक्यता आहे.
प्रत्यक्षात मुइज्जू यांच्या धोरणांबाबत देशात प्रचंड नाराजी असून देशात तांना तीव्र विरोध केला जात आहे. भारत आणि भ्रष्टाचाराविरोधातील मोहिमेमुळे मुइज्जू यांच्यावर सर्व बाजूंनी टीका होत आहे. दरम्यान प्रमुख विरोधीपक्ष आणि भारत समर्थक पक्ष मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) बहुमत मिळवेल, असा विश्वास भारताला आहे.
देशाचे विद्यमान अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. ज्यांवर भारत आणि चीनचे लक्ष आहे.दोन्ही देश मालदीवमध्ये आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. मालदीव हिंद महासागरात सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी आहे. अशा परिस्थितीत भारत आणि चीन मालदीवमध्ये आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.