1 जानेवारी 2022 पासून हे नियम बदलणार, तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

पुढील महिन्यापासून म्हणजेच 1 जानेवारी 2022 पासून तुमच्या आयुष्याशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत.
1 जानेवारी 2022 पासून हे नियम बदलणार
1 जानेवारी 2022 पासून हे नियम बदलणारSaam Tv
Published On

मुंबई : पुढील महिन्यापासून म्हणजेच 1 जानेवारी 2022 पासून तुमच्या आयुष्याशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत. या नियमांमध्ये ठेवी, डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे बँकेतून पैसे काढण्याशी संबंधित नियम आहेत. जीएसटी कायद्यात बदल होणार आहेत. जीएसटी काउन्सिलने फुटवेअर आणि टेक्सटाईल क्षेत्रातील इनव्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चरमध्येही काही बदल केले आहेत. हे सर्व बदल 1 जानेवारी 2022 पासून लागू होतील. या नियमांबद्दल जाणून घेऊया. (Major Rules Changing From 1st January 2022 Along With ATM Transaction And Online Good Oder)

रोख पैसे काढण्यासाठी शुल्क आकारले जाईल

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (India Post Payments Bank -IPPB) च्या खातेधारकांना एका मर्यादेपर्यंत रोख रक्कम काढण्यासाठी आणि जमा करण्यासाठी शुल्क भरावे लागेल. हा नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार आहे. आयपीपीबीमध्ये तीन प्रकारची बचत खाती उघडली जाऊ शकतात. ज्यामध्ये अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या मते, बेसिक सेव्हिंग अकाउंटमधून दर महिन्याला चार वेळा पैसे काढता येतात. मात्र, त्यानंतर प्रत्येक वेळा पैसे काढण्यासाठी किमान 25 रुपये द्यावे लागतील. मूलभूत बचत खात्यात पैसे जमा करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

हेही वाचा -

1 जानेवारी 2022 पासून हे नियम बदलणार
'या' राज्यात पेट्रोल 25 रुपयांनी स्वस्त; नागरिकांना नववर्षाची भेट

जानेवारीपासून एटीएममधून पैसे काढणे महागणार

पुढील महिन्यापासून ग्राहकांनी मोफत एटीएम (ATM) व्यवहाराची मर्यादा ओलांडल्यास त्यांना अधिक पैसे द्यावे लागणार आहेत. जूनमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँकांना 1 जानेवारी 2022 पासून एटीएममधून विनामूल्य मासिक पैसे काढण्यासाठी शुल्क वाढवण्याची परवानगी दिली. प्रत्येक बँक प्रत्येक महिन्याला रोख आणि नॉन-कॅश एटीएम व्यवहार देते. आता 1 जानेवारीपासून फ्री लिमिटनंतर शुल्क भरावे लागणार आहे. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, अॅक्सिस बँक किंवा इतर बँकेच्या एटीएममधील मोफत मर्यादेपेक्षा जास्त आर्थिक व्यवहारांवर 21 रुपये अधिक जीएसटी लागू होईल.

डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरण्याचे नियम बदलणार

1 जानेवारीपासून डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करण्याची पद्धत बदलणार आहे. ऑनलाइन पेमेंट अधिक सुरक्षित करण्यासाठी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने नियम बदलले आहेत. आता ऑनलाईन पेमेंट करताना, तुम्हाला 16 अंकी डेबिट किंवा क्रेडिट कार्ड क्रमांकासह कार्डचे सर्व तपशील भरावे लागतील. म्हणजेच, आता व्यापारी वेबसाइट किंवा अॅप ऑनलाईन शॉपिंग आणि डिजिटल पेमेंट दरम्यान तुमच्या कार्डचे तपशील सेव्ह करु शकत नाहीत.

Google चे नियम बदलतील

तुमचे पेमेंट करण्याचे कार्ड डिटेल्स Google Play Store वर सेव्ह केले जाणार नाहीत. आधीच सेव्ह केलेली कोणतीही माहिती हटविली जाईल. पेमेंट करण्यासाठी तुम्हाला तुमची माहिती पुन्हा एंटर करावी लागेल.

घरगुती गॅस सिलेंडरची किंमत

एलपीजीच्या किमती प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला निश्चित केल्या जातात. यावेळी 1 जानेवारी 2022 रोजी नवीन वर्षाच्या दिवशी सिलेंडरच्या किमती वाढतात का हे पाहावे लागेल.

शूज आणि रेडिमेड कपड्यांवरही GST भरावा लागणार

नवीन कर दरानुसार आता चपलांवर 12 टक्के कर लागणार आहे. चपलांची किंमत किती आहे याचा काही फरक पडणार नाही. कापूस वगळता सर्व कापड उत्पादनांवर 12 टक्के जीएसटी लागेल. रेडिमेड कपड्यांवरही 12 टक्के जीएसटी लागणार आहे.

ऑनलाईन ऑटो राईडवरही जीएसटी भरावा लागणार

स्टार्टअपद्वारे पुरवल्या जाणार्‍या परिवहन सेवेवरही 5% GST लागू होईल. जर ऑटोरिक्षा चालक ऑफलाईन पद्धतीने सेवा देत असेल तर जीएसटी लागू होणार नाही.

जेवण ऑनलाईन ऑर्डर केल्यावर जीएसटी भरावा लागेल

1 जानेवारीपासून, स्विगी आणि झोमॅटो सारखे ई-कॉम स्टार्टअप त्यांच्याद्वारे प्रदान केलेल्या सेवांवर जीएसटी आकारतील. त्यांना आता अशा सेवेचे चालान सरकारकडे जमा करावे लागणार आहे. पण, यामुळे अंतिम खर्चावर म्हणजेच तुमच्या खिशावर जास्त भार पडणार नाही.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com