जीव वाचवण्यासाठी 'माही'ने मागितली मोदींकडे मदत; उपचारासाठी हवेत 2.5 कोटी

देशात सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करावा लागत आहे.
जीव वाचवण्यासाठी 'माही'ने मागितली मोदींकडे मदत; उपचारासाठी हवेत 2.5 कोटी
जीव वाचवण्यासाठी 'माही'ने मागितली मोदींकडे मदत; उपचारासाठी हवेत 2.5 कोटीSaam Tv
Published On

वृत्तसंस्था : देशात सध्या कोरोनाच्या Corona महाभयंकर संकटाचा सामना करावा लागत आहे. या दरम्यान अनेक मन सुन्न करणाऱ्या घटना देखील समोर येत आहेत. अशीच एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबामधील चिमुकलीला दुर्मीळ आजार झाला आहे. मात्र, उपचाराकरिता येणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च करणे, कुटुंबीयांकरिता कठीण झाले आहे. दिल्ली Delhi मधील ७ वर्षीय माहीला गंभीर आजार झाला आहे.

हा अत्यंत दुर्मिळ आजार असल्याने, लाखो- करोडो मुलांमध्ये फारच क्वचित मुलांना होत असतो. माहीचे वडील सुशील कुमार यांनी दिल्ली पोलीस Police आयुक्तांकडे Commissioner यावेळी मदत मागितली आहे. माहीने स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi यांना एका व्हिडिओद्वारे Video मदत करण्याची विनंती केली आहे. सांगितलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या केंद्रीय विद्यालयामध्ये दुसरीत शिकणाऱ्या अवघ्या ७ वर्षांच्या माहीला अत्यंत दुर्मीळ असा 'A (MPS) IV A ENZYME DISORDER' हा आजार झालेला आहे.

हे देखील पहा-

या आजारात रुग्णाच्या हाडांची वाढ थांबत असते. हळूहळू शरीराची वाढ देखील खुंटत जात असते. हाडांचे नुकसान वाढत जात असते. तसे रुग्णही अपंग होत असतो, आणि आजार अधिक तीव्र झाल्यास मृत्यूचाही धोका असतो. आतापर्यंत माहीच्या उपचारांकरिता लाखो रुपये खर्च झाले आहेत. तिच्या वडिलांनी याकरिता लाखो रुपयांचे कर्ज घेतले आहे. पण माहीच्या उपचाराकरिता २ कोटी ४३ लाख रुपयांची गरज आहे, जी रक्कम जमा करणे अशक्य आहे.

कुटुंबीयांनी माहीच्या उपचाराकरिता चक्क पंतप्रधानांकडे मदत मागितली आहे. या अगोदर मोदींनी अशा रुग्णांच्या उपचाराकरिता तत्काळ मदतीचे आदेश दिल्याची उदाहरणे आहेत. यामुळे माहीच्या बाबत देखील तिच्या कुटुंबाला आशा वाटत आहे. दिल्ली मधील एम्स AIIMS रूग्णालयात अशा एका रुग्णावर उपचार सुरू असल्याने माहीवर एम्समध्ये चांगले उपचार होतील, अशी आशा माहीचे वडील सुशील कुमार यांना यावेळी वाटत आहे.

जीव वाचवण्यासाठी 'माही'ने मागितली मोदींकडे मदत; उपचारासाठी हवेत 2.5 कोटी
कोरोना बाधितांवर उपचारासाठी ‘काश्मीर’ घेतेय जळगावच्या डॉक्‍टराची मदत

मात्र, या आजारावर आवश्यक औषधे ब्राझील, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि चीनमध्ये याठिकाणी उपलब्ध आहे. ती अतिशय महाग आहेत. सुशील कुमार हे एमटीएस MTS म्हणजेच दिल्ली पोलीस दलात Delhi Police Force चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. सुशील यांना महिना २७ हजार रुपये पगार असल्यामुळे एवढी रक्कम उभारणे अशक्यच आहे. मागील १५ वर्षांपासून दिल्ली पोलीस मुख्यालयात तैनात आहेत.

आपल्या २ मुली आणि पत्नीसह ते दिल्लीच्या सरस्वती विहार पोलीस कॉलनी मध्ये राहत आहेत. माहीच्या उपचाराकरिता त्यांनी १० लाखांचे वैयक्तिक कर्ज, १ लाख रुपयांचे पोलीस कर्ज घेतले आहे. अशा केसेसमध्ये कर्मचाऱ्यांना विभागाकडून मिळणारी मदत देखील माहीच्या आतापर्यंतच्या उपचाराकरिता खर्च झाली आहे. आपल्या चिमुकलीचा जीव वाचावा याकरिता तिच्या उपचारासाठी आवश्यक रक्कम उभी करण्यासाठी सुशील कुमार धडपडत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे महत्वाचे वृत्त यावेळी दिले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com