नवी दिल्ली : लेफ्टनंट जनरल बी.एस. राजू यांची लष्कराचे नवे उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. इंडियन आर्मीच्या (Indian Army) ट्विट हँडलवरुन जनरल एमएम नरवणे सीओएएस आणि भारतीय सेनेतील अधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
लेफ्टनंट जनरल बग्गावल्ली सोमशेकर राजू ०१ मे २०२२ रोजी लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारतील. राजू हे सैनिक स्कूल विजापूर आणि राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे माजी विद्यार्थी आहे. त्यांची १५ डिसेंबर १९८४ रोजी जाट रेजिमेंटमध्ये नियुक्ती करण्यात आली होती. उरी ब्रिगेड, काउंटर इनसर्जेंसी फोर्स आणि काश्मीर खोर्यातील चिनार कॉर्प्सचे कमांडिंग करण्याचा मान त्यांच्याकडे आहे. त्यांनी भूतानमध्ये भारतीय लष्करी (Indian Army) प्रशिक्षण संघाचे कमांडंट म्हणूनही काम केले आहे.
राजू हे एक हेलिकॉप्टर पायलट आहेत. ते जाट रेजिमेंटचे कर्नलही आहेत. त्यांनी नेव्हल पोस्ट ग्रॅज्युएट स्कूल, मॉन्टेरी, यूएसए येथे काउंटर टेररिझममध्ये विशिष्ट मास्टर प्रोग्राम पदवी देखील पूर्ण केली आहे. त्यांच्या सेवेतील अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक आणि युद्ध सेवा पदकांनी सन्मानित करण्यात आले आहे.
३८ वर्षांच्या आपल्या गौरवशाली कारकिर्दीत त्यांनी लष्कराच्या मुख्यालयात अनेक महत्त्वाच्या रेजिमेंट, कर्मचारी आणि निर्देशात्मक नियुक्त्या केल्या आहेत. लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी, जनरल ऑफिसर एलएसीवरील स्टँडऑफ दरम्यान डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्सची पोस्टिंग करत होते.
Edited By- Santosh Kanmuse
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.