गॅस कनेक्शन घेणे झाले महाग! जाणून घ्या किती रुपये लागणार

या आधी १४५० रुपयांना घरगुती गॅस कनेक्शन मिळत होते.
LPG Gas Connection
LPG Gas ConnectionSaam Tv
Published On

मुंबई: अगोदरच महागाईने त्रस्त असलेल्या जनतेला आता पुन्हा महागाईला सामोरे जावे लागणार आहे. तुम्ही जर नवीन घरगुती गॅस (Gas) कनेक्सन घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता घरगुती गॅस कनेक्शनच्या किंमती वाढणार आहेत. पेट्रोल कंपन्यांनी नवीन कनेक्सनसाठी उद्यापासून नवे दर लागू केले आहेत. या अगोदर घरगुती गॅसचे कनेक्शन १४५० रुपयांत घेता येत होता, आता या किमतीत वाढ करुन दोन हजाराच्या पुढे गेल्या आहेत. त्यामुळे आता नवे कनेक्शन घ्यायचे असल्यास खिशाला कात्री लागणार आहे.

नवे दर उद्यापासून म्हणजेच १६ जूनपासून लागू होणार आहेत. आता घरगुती गॅस कनेक्शनचे (Gas connection) दर १४५० रुपये आहेत, यात वाढ करुन याचे नवे २२०० रुपये करण्यात आली आहे. जर तुम्हाला दोन टाक्यांचे कनेक्शन घ्यायचे असेल तर तुम्हाला ४४०० रुपये मोजावे लागणार आहेत.

LPG Gas Connection
इंटरनेटचा स्पीड दहा पटीने वाढणार! देशात 5G सुरू होणार; कॅबिनेटने दिली मंजुरी

याअगोदर रेग्युलेटरसाठी १५० रुपये द्यावे लागत होते, पण आता यासाठी २५० रुपये द्यावे लागणार आहेत. ५ किलोच्या सिलेंडरची सुरक्षा आता ८०० ऐवजी ११५० करण्यात आली आहे, अशी माहिती इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमने दिली आहे.

पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेतून गॅस कनेक्शन घेणाऱ्यांनाही याचा झटका बसणार आहे. जर त्या ग्राहकांनी डबल सिलेंडर कनेक्शन घेतले तर त्या ग्राहकांना सिक्युरिटी अमाउंट द्यावी लागणार आहे. दरम्यान, पहिल्यांदा कनेक्शन घेणाऱ्यांना पहिल्या सिलेंडरसाठीच सिक्युरिटी अमाउंट द्यावी लागणार आहे.

LPG Gas Connection
प्रतीक्षा संपली! रणबीर आलियाच्या ‘ब्रह्मास्त्र’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

हे आहेत दर

विनाअनुदानित गॅस सिलिंडरची किंमत– १०६५ रुपये

सिलेंडरसाठी सुरक्षा - २२०० रुपये

रेग्युलेटरसाठी सुरक्षा- २५० रुपये

पासबुकसाठी - २५ रुपये

पाईपसाठी- १५० रुपये

यासह पहिल्या गॅस कनेक्शनसाठी ३६९० रुपये खर्च करावे लागणार आहेत. पेट्रोल(Petrol), डिजेलच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहेत. त्यामुळे महागाई वाढत आहे. काँग्रेसने देशभरात महागाई विरोधात आंदोलन केले. यानंतर केंद्र सरकारने इंधनावरील कर कमी करुन पेट्रोल, डिझेलचे दर कमी केले आहेत.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com