Congress On PM Modi: पीएम मोदींविरोधात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडमध्ये, निवडणूक आयोगात दाखल केल्या १७ तक्रारी

Congress Criticized On PM Modi: मोदींच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी, सलमान खुर्शीद आणि गुरदीप सप्पल यांनी निवडणूक आयोगात धाव घेत मोदींविरोधात 17 तक्रारी दाखल केल्या आहेत.
Rajasthan Assembly Election 2023
Congress On PM Narendra ModiSaam Tv

'काँग्रेस सत्तेत आली तर जनतेची संपत्ती मुस्लिमांमध्ये वाटून टाकेल', असे वक्तव्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काँग्रेसवर (Congress) टीका केली होती. पीएम मोदींनी राजस्थानमधील बांसवाडा येथे हे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून आता गदारोळ झाला आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून ते पीएम मोदी आणि भाजपवर हल्लाबोल करत आहे. मोदींच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी, सलमान खुर्शीद आणि गुरदीप सप्पल यांनी निवडणूक आयोगात (Election Commission On India) धाव घेत मोदींविरोधात 17 तक्रारी दाखल केल्या आहेत.

याप्रकरणी अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, 'पीएम मोदींनी आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. ते काँग्रेसच्या जाहीरनाम्याबद्दल खोटे बोलत आहेत. त्यांच्या वक्तव्यावर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी. हात जोडून मी पीएम मोदींना विनंती करतो की, त्यांनी जे विधान केले ते करायला नको होते. ते विधान त्यांच्या अधिकृत हँडलवर आहे. त्यांनी एका समाजाचे नाव घेतले आहे. ते एका धर्माबद्दल स्पष्ट बोलले आहे. त्यांनी कलम 123 चे उल्लंघन केले आहे.

Rajasthan Assembly Election 2023
Rahul Gandhi: 'सूरत'वरून धुरळा! राहुल गांधी संतापले; म्हणाले, संविधान संपवण्याच्या दिशेने एक पाऊल!

रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची राजस्थानच्या बांसवाडा येथे सभा झाली. या सभेदरम्यान पीएम मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. या सभेदरम्यान त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या एका वक्तव्याचाही उल्लेख केला. देशाच्या मालमत्तेवर मुस्लिमांचा पहिला हक्क असल्याचे मनमोहन सिंग यांनी म्हटले होते, असा दावा पंतप्रधान मोदींनी केला. या वक्तव्याद्वारे पंतप्रधानांनी काँग्रेसवर निशाणा साधला आणि काँग्रेस सत्तेत आल्यास लोकांच्या मालमत्तेची मुस्लिमांमध्ये वाटणी करेल, असे विधान केले. 'ही शहरी-नक्षलवादी मानसिकता माता-भगिनींचे मंगळसूत्रही सोडणार नाही.', असे देखील त्यांनी म्हटलं होतं.

Rajasthan Assembly Election 2023
Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना धक्का! जामिनावरील जनहित याचिका फेटाळली; ७५ हजारांचा ठोठावला दंड

पीएम मोदींच्या वक्तव्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत त्यांच्यावर निशाणा साधला होता. खरगेंनी असे लिहिले होते की, 'आज मोदीजींच्या संतप्त भाषणाने पहिल्या टप्प्यातील निकालात भारताचा विजय झाल्याचे दिसून आले. मोदीजी जे बोलले ते नक्कीच द्वेषयुक्त भाषण आहे. लोकांचे लक्ष विचलीत करण्याचा मुद्दाम केलेला डाव आहे. सत्तेसाठी खोटे बोलणे, गोष्टींचे खोटे संदर्भ देणे आणि विरोधकांवर खोटे आरोप करणे हे संघ आणि भाजपच्या प्रशिक्षणाचे वैशिष्ट्य आहे.', अशी टीका खरगे यांनी केली.

Rajasthan Assembly Election 2023
Narendra Modi : आता आई-बहिणींच्या मंगळसूत्रावर त्यांची नजर; काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर PM नरेंद्र मोदींची जहरी टीका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com