Bihar Crime News: वहिनीच्या प्रेमात पार आंधळा झाला; सख्ख्या भावावरच झाडल्या गोळ्या

Brother Killed His Big Brother In Bihar: आपल्याला कायम वहिनीसोबत राहता यावे यासाठी लहान भावाने आपल्या मोठ्या भावाची हत्या केली आहे.
Bihar News
Bihar NewsSaam TV

Bihar News: बिहारमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथे सख्या भावाने आपल्या मोठ्या भावाची गोळ्या झाडून हत्या केली आहे. मोठा भाऊ हा विवाहीत होता. त्याच्या पत्नीसह लहान भावाचे प्रेमप्रकरण सुरू होते. आपल्याला कायम वहिनीसोबत राहता यावे यासाठी लहान भावाने आपल्या मोठ्या भावाची हत्या केली आहे. (Latest Crime News)

बिहारच्या बेगुसराय येथे ही धक्कादायक घटना घडली असून आरोपीने स्वत:आपल्या हातून झालेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. शुभम कुमार असे लहान भावाचे नाव आहे. तर मोठ्या भावातचे नाव शिवम असे आहे. शुभमचे शिवमच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध होते. हे प्रेमसंबंध पूर्ण व्हावेत आपल्या दोघांना कायम एकत्र राहता यावे. आपल्याला त्रास देण्यासाठी मध्ये कोणीही येऊनये यासाठी शिवमची पत्नी आणि शुभम या दोघांनीही हा डाव रचला.

Bihar News
Kolhapur Crime News: आधी वडिलांची हत्या, मग स्वत: संपवलं जीवन; तरुणानं का उचललं टोकाचं पाऊल?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत एक पिस्तूल, त्यातील गोळ्या आणि एक चोरी केलेली पल्सर दुचाकी आणि चार व्यक्तींचे मोबाईल इत्यादी गोष्टी जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी या घटनेत मृत व्यक्तीची पत्नी चांदणी आणि लहान भाऊ यांच्यासह अन्य दोन मुलांना ताब्यात घेतलं आहे. शिवम हा गुजरातमध्ये एका कंपनीत नोकरी करत होता. १५ दिवसांआधी तो आपल्या बायकोला तिकडे घेऊन जाण्यासाठी आला होता.

भाऊ आल्यावर आता वहिनी आपल्यापासून लांब जाणार या भावनेने शुभम गोंधळून गेला. त्याने ३० एप्रिल रोजी सायंकाळी ७ च्या सुमारात भाऊ शिवम दुचाकीवरून जात असताना मागून त्याच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेत शिवम धाडकन खाली कोसळला आणि त्याचा जीव गेला.

Bihar News
Girls Tops Under Rs. 200: मुलींनो लूटा...! फक्त २०० रुपयांत टॉप!; मुंबईतील 'या' मार्केटमध्ये मिळतायत स्वस्त आणि मस्त कपडे

पोलिसांना (Police) या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेताली आणि आपला तपास सुरू केला. १५ दिवस तपास केल्यावर आखेर आता शुभम आणि चांदणी यांचा शोध लागला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com