लालूप्रसाद यादव यांना मोठा दिलासा, आज होणार जामिनावर सुटका

लालूप्रसाद यादव यांना मोठा दिलासा, आज होणार जामिनावर सुटका

नवी दिल्ली : चारा घोटाळ्याशी (Fodder Scam) संबंधित डोरंडा प्रकरणात (Doranda Case) दोषी ठरलेले लालू प्रसाद यादव (lalu prasad yadav) यांच्या जामिनासाठी सीबीआय न्यायालयाने आदेश जारी केले आहेत. १० लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन (bail granded) मंजूर करण्यात आला आहे. लालूंनी सुटकेसाठी न्यायालयात १० लाख रुपये जमा केले आहेत. याप्रकरणी सुटकेसाठी कागदोपत्री कार्यवाही सुरू आहे. त्यानुसार लालूप्रसाद यादव यांची तुरुंगातून (jail) कधीही सुटका होऊ शकते.

लालूप्रसाद यादव यांना मोठा दिलासा, आज होणार जामिनावर सुटका
Lalu Yadav: 'भाजपशी तडजोड केली असती तर लालू त्यांच्यासाठी राजा हरिश्चंद्र ठरले असते'

झारखंड उच्च न्यायालयाचे (high court) न्या. अपरेश कुमार सिंग यांनी शुक्रवारी १० लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. तुरुंगात अर्धी शिक्षा पूर्ण केल्याच्या आधारे लालू प्रसाद यादव यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

डोरंडा प्रकरणात जामीन मिळाला आहे
लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्याशी संबंधित डोरंडा ट्रेझरी प्रकरणात जामीन मिळाला आहे. हे प्रकरण डोरांडा ट्रेझरीमधून 139 कोटी रुपये काढण्याबाबत आहे. 1990 ते 1995 दरम्यान डोरांडा तिजोरीतून 139 कोटी रुपये काढण्यात आले. 27 वर्षांनंतर न्यायालयाने या वर्षी फेब्रुवारीमध्ये या घोटाळ्यावर निकाल दिला होता, ज्यामध्ये लालू यादव दोषी ठरवण्यात आलं होतं.

लालूप्रसाद यादव यांना मोठा दिलासा, आज होणार जामिनावर सुटका
Lalu Prasad Yadav : चारा घोटाळा प्रकरणी लालू यादवांना पाच वर्षांची शिक्षा

या प्रकरणी लालू यादव यांना पाच वर्षांची शिक्षा आणि 60 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. शिक्षेचा अर्धा कालावधी पूर्ण झाल्याच्या आधारे उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. यासाठी त्यांना 10 लाखांचा जामीन बॉण्ड जमा करण्याचे आदेश देण्यात आले.

एम्समध्ये उपचार सुरू आहेत
अधिवक्ता अनंत कुमार यांनी सांगितले की, रंजन कुमार आणि अंजल किशोर सिंह यांनी लालू प्रसाद यांच्यासाठी जामीनपत्र भरले. न्यायालयाने दिलेला आदेश बिरसा मुंडा कारागृहात पाठवण्यात आला आहे. लालू प्रसाद यांच्यावर सध्या एम्समध्ये न्यायालयीन कोठडीत उपचार सुरू आहेत. त्यांना एम्समधून डिस्चार्ज देण्याचा निर्णय तेथील डॉक्टर घेतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com