ज्या आजारासाठी रूग्णालयाने मागितले ८ लाख, केवळ १२८ रूपयांत ठणठणीत बरा झाला रूग्ण; काय आहे नेमकं प्रकरण?

उत्तर प्रदेशातील एका खाजगी रूग्णालयाने किरकोळ उपचारांसाठी रूग्णाला तब्बल ८ लाखांची मागणी केल्याचं समोर आलं आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे, पाहूयात.
8 lakhs
8 lakhs
Published On

आजारपणात किती खर्च आला तरीही आपल्याला तो करावा लागतो. अशावेळी रूग्णालयं जे बील आपल्या हातात देतात आपण ते भरतो. अशात अनेकदा खाजगी रूग्णालयं रूग्णांना लुटतात, असा आरोपही करण्यात येतो. असंच एक उदाहरण आता समोर आलं आहे. उत्तर प्रदेशातील एका खाजगी रूग्णालयाने किरकोळ उपचारांसाठी रूग्णाला तब्बल ८ लाखांची मागणी केल्याचं समोर आलं आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे, पाहूयात.

उत्तर प्रदेशातील एका खासजी रूग्णालयाने त्यांच्याकडे आलेल्या एका रूग्णाला जिवाला धोका असल्याचं सांगत उपचारासाठी तब्बल 8 लाख रुपयांची मागणी केली. मात्र यानंतर रूग्णाने दुसऱ्या रूग्णालयाचा रस्ता धरला. यावेळी रुग्णाला दुसऱ्या खासगी हॉस्पिटलने केवळ 128 रुपयांचं औषध देऊन बरं केल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या रूग्णाला केवळ गॅसचा त्रास होत होता. मात्र पहिल्या रूग्णालयातील डॉक्टरांनी त्याला व्हॉल्व्ह बदलण्याचं सांगत त्यानुसार उपचाप घेण्याचा सल्ला दिला होता.

दरम्यान या लूट करणाऱ्या रूग्णायावर अनेक आरोप देखील केले गेले. जेव्हा रूग्णाने या रूग्णालयात उपचार घेण्यास मनाई केल्यानंतर त्याच्याशी असभ्य वर्तन करण्यात आलं. इतकंच नाही तर मोठ्या कष्टाने रुग्णाला सोडण्यात आल्याचं इतरांनी सांगितलं आहे. रूग्णाच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार करून या लूट करणाऱ्या रूग्णालयावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी म्हणजेच मे महिन्यात मोहन भारद्वाज घरी कोसळले. त्यांना अचानक घाम फुटू लागला. यावेळी भाऊ आणि पत्नीने त्यांना जवळच्या रूग्णालयात दाखल केलं. याठिकाणी डॉक्टरांनी अँजिओग्राफीसह इतर तपासण्या केल्या. त्यानंतर रुग्णाच्या हृदयातील व्हॉल्व्ह बदलावा लागेल असं सांगून उपचारासाठी सुमारे आठ लाख रुपयांची तातडीने व्यवस्था करण्यास सांगितलं. इतंकच नाही तर घाई केली नाही, तर रूग्णाचा मृत्यू होईल, असंही डॉक्टरांनी सांगितलं असल्याचं समोर आलं आहे.

कुटुंबाने दिला नकार

दरम्यान कुटुंबाने केवळ २ लाखांची व्यवस्था असल्याचं सांगून उपचार घेण्यास नकार दिला. यावेळी नातेवाईकांनी रूग्णाला दुसऱ्या रूग्णालयात नेण्यासाठी प्रयत्न सुरु केले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी शिवीगाळ सुरू केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. अखेर मोठ्या प्रयत्नांनंतर रुग्णाला सोडण्यात आलं. तर दुसऱ्या एका खासगी रुग्णालयात रुग्णाला गॅसची समस्या दूर करण्यासाठी दोन इंजेक्शन आणि काही औषधं देण्यात आली. त्याची किंमत फक्त 128 रुपये होती. या उपचारांंनंतर रूग्णाची स्थिती सुधारली आणि त्याला डिस्चार्ज देण्यात आला.

८ लाख रूपये सांगितलेल्या रुग्णालयाच्या अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णाच्या छातीत दुखत असल्याने तो ओपीडीमध्ये आला होता. यावेळी आम्ही त्याची तपासणी केली आणि त्याच्या रक्तात ट्रोपोनिन I चं प्रमाण जास्त आढळून आलं. त्यांना हृदयविकाराचा त्रास होत असल्याचं दिसून आलं. ईसीजीमध्ये हृदयात ब्लॉकेजची लक्षणंही दिसली. अँजिओग्राफीमध्ये एका धमनीत 100 टक्के आणि दुसऱ्या धमनीत 80 टक्के ब्लॉकेज असल्याचं समोर आले. आम्ही त्यांना अँजिओप्लास्टी सुचवली होती, त्यासाठी रुग्ण आणि त्याची पत्नी तयार नव्हते. हॉस्पिटलमधून बाहेर पडताना सर्व तपासणी अहवाल दिले होते, त्याचे रेकॉर्ड हॉस्पिटलमध्ये आहे. शिवाय तो रूग्ण आणि नातेवाईकासोबत कोणतंही असभ्य वर्तन केलं नाही, उलट आम्ही त्यांच्यावर तातडीने उपचार केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com