भाजप आमदाराच्या गाडीनं दोन भावांना चिरडलं; अपघातात दोघांचा मृत्यू

भाजप आमदाराच्या (MLA) गाडीने दोन भावांना चिरडले
Lakhimpur Accident, Lakhimpur BJP MLA car Accident News, brothers crushed by BJP MLA car News
Lakhimpur Accident, Lakhimpur BJP MLA car Accident News, brothers crushed by BJP MLA car NewsSaam Tv
Published On

वृत्तसंस्था: उत्तर प्रदेश येथील लखीमपूर खीरी परत एकदा चर्चेत आले आहे. येथे भाजप आमदाराच्या (MLA) गाडीने दोन भावांना चिरडले आहे. आमदाराचे स्टिकर असलेल्या गाडीने दुचाकीस्वार भावांना उघडले आहे. या अपघातामध्ये (Accident) दुचाकीवरील दोन्ही भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघात केलेली कार आमदाराची असल्याचे सांगितले जात आहे. कार आणि चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. हा अपघात कोतवालीच्या रामापूर (Ramapur) गावाजवळ झाला आहे. ही कार भाजप आमदार योगेश वर्मा यांची असल्याचे सांगितले जात आहे. (Lakhimpur Accident Two brothers crushed by BJP MLA car)

हे देखील पहा-

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही मृत लखीमपूर खेरी पोलीस (Police) ठाण्याच्या हद्दीतील किरतपूर या गावचे रहिवासी आहेत. रामापूर येथून घरी परतत असताना हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून स्कॉर्पिओ कार आणि चालकाला ताब्यात घेतले आहे. योगेश वर्मा यांची पत्नी नीलम वर्मा यांच्या नावावर कारची नोंदणी असल्याचे सांगण्यात येत आहे.

Lakhimpur Accident, Lakhimpur BJP MLA car Accident News, brothers crushed by BJP MLA car News
धक्कादायक! पत्नी पाठोपाठ पतीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

या अपघाताच्या वेळी आमदार गाडीत नव्हते असे सांगण्यात येत आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक अरुण सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार की, लखीमपूर- बहराइच रस्त्यावर रामापूरजवळ दुचाकी आणि स्कॉर्पिओ यांच्यात झालेल्या धडकेमध्ये २ तरुणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी आढळलेली स्कॉर्पिओ गाडी भाजप आमदार योगेश वर्मा यांची आहे. या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com