किम जोंग उन यांचं वजन घटलं! कसं आणि का ते पहा...

किम जोंग उन उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते आहेत. त्यामुळे त्यांनी केलेली प्रत्येक कृती उत्तर कोरियाच्या नागरिकांवर परिणाम करत असते.
किम जोंग उन यांचं वजन घटलं! कसं आणि का ते पहा...
किम जोंग उन यांचं वजन घटलं! कसं आणि का ते पहा...Rauters
Published On

उत्तर कोरियाचे तानाशहा किम जोंग उन हे आता पुर्वीप्रमाणे जाड राहिलेले नाही. त्यांच्या वजनात कमालीची घट झाली आहे. नुकतेच त्यांने नवे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात त्यांच्या वजनात चांगलीच घट झालेली दिसतेय. विशेष म्हणजे वजन कमी करण्यासाठी त्यांनी व्यायाम केला नसून अन्नाच्या कमतरतेमुळे त्यांचं वजन घटल्याचं त्यांच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. (Kim Jong Un loses weight! See how and why)

हे देखील पहा-

उत्तर कोरिया (North Korea) जगातील एक रहस्यमयी देश आहे, ज्याचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन (Kim Jong-un) हे एक तानाशाह मानले जातात. ते उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते आहेत. त्यामुळे त्यांनी केलेली प्रत्येक कृती उत्तर कोरियाच्या नागरिकांवर परिणाम करत असते. आता किम जोंग उन बारिक झाले (Weight Loss) तर अनेक चर्चांना उधाण आलं. त्यांच्या बारिक होण्यामागे जे कारण सांगितलं जातंय ते न पटण्यासारखंच आहे, पण तिथल्या नागरिकांना यालाच खरं मानन्याशिवाय काही पर्याय नाही.

किम जोंग उन यांच वजन कमी झाल्याचं नेमकं कारण काय?

उत्तर कोरियात सध्या अन्न धान्याचा प्रचंड तुटवडा आहे. अनेक लोक भुकबळीने मरण पावतायत. अशा परिस्थितीत नागरिकांनी कमी जेवण्याचं आवाहन किम जोंग उन यांनी केलंय. इतर जनतेप्रमाणे आपला सर्वाेच्च नेताही कमीच जेवतो असा दावा उत्तर कोरियाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. कमी जेवण्यामुळेच किम यांचं वजन घटल्याचं कोरियन अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. एकतर उत्तर कोरियाने जगाला स्वतःपासून वेगळं करुन घेतलं आहे, त्यामुळे तिथल्या अन्नटंचाईवर (Food shortage) मात करण्यासाठी तेथील जनतेला मदत करणंही शक्य होत नाही. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अंदाजानुसार ८६०००० टन अन्न-धान्याची कमतरता आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com