हिंसाचारानंतर प्रशासन कडक; ईदसह अनेक सणांना कर्फ्यू हटवला जाणार नाही

खरगोनमध्ये ईद आणि अक्षय तृतीया सणांनाही कर्फ्यू शिथिल केला जाणार नाही
Khargone Violence
Khargone ViolenceSaam Tv
Published On

वृत्तसंस्था: 2 आणि 3 मे रोजी मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) खरगोनमध्ये ईद आणि अक्षय तृतीया सणांनाही कर्फ्यू शिथिल केला जाणार नाही. 10 एप्रिल दिवशी खरगोनमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीत (Procession) दगडफेक आणि जाळपोळ झाल्यानंतर लागू करण्यात आलेला संचारबंदी (Curfew) गेल्या काही दिवसांपासून काही तासांसाठी शिथिल करण्यात आले आहे.

ईद आणि अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कर्फ्यूमध्ये शिथिलता नाही

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत संचारबंदी शिथिल करण्यात आली असून या काळात लोक या सणांसाठी खरेदी करू शकणार आहेत. चंद्रदर्शनावर अवलंबून 2 मे किंवा 3 मे रोजी ईदचा सण साजरा केला जाणार आहे, तर नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि सोन्यासारख्या महागड्या गुंतवणुकीसाठी शुभ मानली जाणारी अक्षय्य तृतीया 3 मे रोजी साजरी केले जाणार आहे.

हे देखील पाहा-

शांतता समितीच्या बैठकीनंतर घेतलेला निर्णय

शांतता समितीच्या बैठकीनंतर, खरगोनचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी सुमेर सिंग मुजल्डा म्हणाले की, आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर 2 आणि 3 मे रोजी खरगोनमध्ये कर्फ्यू शिथिल केला जाणार नाही. अक्षय्य तृतीयेला शहरात कोणताही विवाह सोहळा होऊ दिला जाणार नाही, असे ते यावेळी म्हणाले आहेत. रविवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत ९ तासांसाठी कर्फ्यू शिथिल करण्यात आला असून रविवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत या शिथिलतेमध्ये लोक लग्न समारंभासाठी खरगोन शहराबाहेर जाऊ शकतात. हे सण घरीच साजरे करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे. विविध परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष पास जारी करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

मात्र, सध्याच्या परिस्थितीनुसार प्रशासन हे निर्णय बदलू शकते. सध्या शहरातील परिस्थिती पूर्णपणे सामान्य असली, तरी आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर पोलिस दल पूर्णपणे सतर्क आहे. अतिरिक्त पोलीस बंदोबस्त पाचारण करण्यात येत असून कायदा व सुव्यवस्था राखली जाणार आहे. कर्फ्यूचे उल्लंघन करणाऱ्यांना पोलिस वाहने आणि तात्पुरत्या तुरुंगात टाकले जाणार असल्याचे, त्यांनी यावेळी सांगितले आहे. विविध घटकांसोबत बैठकांची फेरी सुरू असून सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.

10 एप्रिल रोजी रामनवमीच्या मिरवणुकीवर कथित दगडफेकीनंतर खरगोन शहरात जाळपोळ झाल्याच्या घटना घडल्या, ज्यात दुकाने, घरे आणि वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यानंतर संपूर्ण शहरात संचारबंदी लागू करण्यात आली. 14 एप्रिलपासून स्थानिक प्रशासन कर्फ्यू काही तासांसाठी शिथिल करत आहे. अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी सुमेरसिंग मुझलदा यांनी दिलेल्या माहितीनुसार, संचारबंदीच्या शिथिल कालावधीत कृषी बाजार, दूध, भाजीपाला आणि औषधांच्या दुकानांसह दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. सफाई कामगारांची दुकाने. धार्मिक स्थळे, पेट्रोल पंप आणि दुकानांना परवानगी देण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com