kerala Elephant Video : केरळमध्ये अरात्तुपुझा उत्सवात बिथरले हत्ती, चेंगराचेंगरीत काही भाविक जखमी; पहा थरारक Video

kerala Elephant Video : केरळमधील त्रिशूरमध्ये अरात्तुपुझा उत्सव सुरू असताना दोन हत्ती बिथरेल आणि एकच गोंधळ उडाला. दोन्ही हत्ती एकमेकांना भीडले होते. यातून झालेल्या चेंगराचेंगरीत तीन भाविक जखमी झाले आहेत.
 kerala Elephant Video
kerala Elephant Video Saam Digital

kerala Elephant Video

केरळमधील त्रिशूरमध्ये अरात्तुपुझा उत्सव सुरू असताना दोन हत्ती बिथरेल आणि एकच गोंधळ उडाला. दोन्ही हत्ती एकमेकांना भीडले होते. यातून झालेल्या चेंगराचेंगरीत तीन भाविक जखमी झाले आहेत. काल रात्री 10.30 च्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. चवळपास अर्ध्यातासानंतर रात्री 11 वाजता सुरक्षा पथकाने हत्तींवर नियंत्रण मिळवल्याची माहिती आहे.

सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायलरल होत आहे. ज्यात दोन हत्ती कार्यक्रम सुरू अशताना अचानक बिथरले आणि एकमेकांवर हल्ला करताना दिसत आहेत. हत्तीवर सवार माहुत त्यांच्यावर नियंत्रण मिळवतात मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते. तरीही माहुतांनी हत्तीचा ताबा सोडला नव्हता. यावेळी उत्सवात उपस्थित भाविक वाट मिळेल त्या दिशेने पळताना दिसत आहेत. थोड्या वेळात हत्तींना माहुत कार्यक्रमाच्या बाहेर घेऊन जातात. त्यानंतर अर्थातास हा थरार सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. या दरम्यान परिसरात एकच गोंधळ माजला होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

 kerala Elephant Video
CCTV Footage : भररस्त्यात तरुणीला गाठलं, केस ओढून खाली पाडलं; तरुणाचं संतापजनक कृत्य

३000 वर्षांहून अधिक जुने प्राचीन अरातुपुझा मंदिर केरळमधील त्रिशूर येथील अरातुपुझा येथे आहे. जिथे दरवर्षी देवमेळा उत्सव आयोजित केला जातो. येथे पुरमचं प्रदर्शन हत्तींच्या पाठीवर केले जातं. प्रत्येक हत्ती एका देवतेचे प्रतिनिधित्व करतो. येथे थिरुत, अता, नालीकेरामदुकल आणि करिकाभिषेकम हे मुख्य प्रसाद आहेत. आरातुपुझा मंदिर कोचीन देवस्वोम बोर्डाच्या अंतर्गत आहे.

 kerala Elephant Video
Arvind Kejriwal News: दिल्ली सरकार तुरुंगातून चालणार! CM अरविंद केजरीवाल यांचा 'ईडी कोठडी'तून पहिला आदेश जारी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com