Kedarnath Helicopter Incident
Kedarnath Helicopter IncidentSaam Tv

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात होता होता टळला; थराराक व्हिडिओ

यात कोणीही जखमी झालेले नाही. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Published on

देहरादून: केदारनाथमध्ये ३१ मे रोजी एका खासगी विमान कंपनीचे एक हेलिकॉप्टर (Helicopter) लँडिंग दरम्यान अपघात होत असताना थोडक्यात बचावले. लँडिंग दरम्यान पायलटचे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण काही काळ तुटले होते. नंतर पायलटने हेलिकॉप्टर पुन्हा नियंत्रणात आणून सुरक्षित लँड केले. यात कोणताही प्रवासी जखमी झालेला नाही. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Kedarnath Helicopter Incident
कोणत्याही निर्बंधांशिवाय आषाढी वारी होणार; राजेश टोपेंनी दिली माहिती

यावर आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने हेलिकॉप्टर (Helicopter) पायलटांना लँडिंग संबंधी सूचना जारी केल्या आहेत. यात सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे. यासोबतच ऑपरेटर्सच्या कामांची माहिती घेण्यासाठी स्पॉट चेकचेही नियोजन करण्यात आले आहे. ३१ मे रोजी घडलेल्या घटनेची चौकशी करण्यात येणार आहे.

केदारनाथमध्ये सततच्या खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर (Helicopter) पायलटनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. ३१ मे रोजीही असाच प्रकार घडला होता. खराब हवामानामुळे पायलटला लँडिंग करताना अडचणींचा सामना करावा लागला. पण पायलटने पन्हा हेलिकॉप्टर नियंत्रित आणले, त्यामुळे अपघात टळला.

आता नागरी विमान वाहतूक विभाग या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे. हा अपघात हवामानामुळे झाला की वैमानिकाच्या निष्काळजीपणामुळे झाला याचा शोध घेतला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com