वृत्तसंस्था : जम्मू- काश्मीरमधील पुंछ येथील भट्टा दुरियनच्या घनदाट जंगलात मध्ये आज सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चांगलीच चकमक झाली आहे. यामध्ये 2 पोलीस आणि एक लष्करी जवान जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे. सुरक्षा दलांनी तुरुंगात बंद पाकिस्तानी दहशतवादी जिया मुस्तफाला भट्टा दुरियन या ठिकाणी आणले होते, जेणेकरून दहशतवाद्यांचे लपलेले ठिकाण ओळखता येईल.
मात्र, त्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरवात केले. दुसरीकडे, शोपियानमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या गोळीबारात एका तरुणाचा गोळी लागून मुत्यू झाला आहे. भट्टा दुरियानच्या जंगलात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मागील 13 दिवसांपासून चकमक सुरू आहे. दहशतवादी अड्डे ओळखण्यासाठी सुरक्षा दल जिया मुस्तफाला घेऊन आले होते. त्यानंतर दहशतवाद्यांशी चकमक सुरू झाली.
हे देखील पहा-
दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात 2 पोलीस आणि 1 लष्करी जवान जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. यादरम्यान, जिया देखील जखमी झाली आहे. गोळीबारामुळे त्याला बाहेर काढता आले नाही. त्याचवेळी जखमी सैनिकांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुस्तफा हा कट्टर दहशतवादी आहे. जम्मू- काश्मीरच्या कारागृहात राहताना तो पुंछ आणि राजौरीमध्ये लपलेल्या दहशतवादी गटांशी सतत संपर्कात होता. हे लोक सतत एकमेकांना ऑपरेशन आणि उपक्रमांची माहिती देत होते. जिया पीओके मधील रावळकोटची रहिवासी आहेत.
जम्मूच्या भलवल मध्यवर्ती कारागृहातून फोनद्वारे तो दहशतवाद्यांच्या संपर्कात होता. मुस्तफाच्या संशयास्पद भूमिकेनंतर सुरक्षा दलांनी त्याला 10 दिवसांच्या रिमांडवर मेंढर- पुंछ या ठिकाणी आणले होते. पूंछमधील 13 दिवस जुन्या चकमकीत मुस्तफाच्या भूमिकेबद्दल त्याची चौकशी सुरू आहे. मुस्तफा १५ वर्षांपूर्वी एलओसीवरून भारतात आला होता.
सीआरपीएफच्या म्हणण्यानुसार, सीआरपीएफ पार्टी शोपियांच्या बाबापोरामध्ये शोध मोहीम राबवत होती. त्यानंतर दहशतवाद्यांनी पार्टीवर गोळीबार करण्यात आला होता. याला सुरक्षा दलांनीही चोख प्रत्युत्तर दिले होते. दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारात एक युवक ठार झाला होता. मात्र, मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. शोपियान एसएसपीने क्रॉस फायरिंगमध्ये युवकाचा मृत्यू झाल्याबद्दल सांगितले आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.