Karnataka Election Result 2023: भाजप मोडणार का 38 वर्षाची परंपरा? जाणून घ्या कर्नाटकच्या राजकारणातला हा खास रेकॉर्ड...

Karnataka VidhanSabha Election Result- प्रत्येक राज्याच्या राजकारणातील एक खास बाब असते, तसाच कर्नाटकच्या राजकारणात हा रेकॉर्ड महत्वाचा आहे...
Karnataka Election
Karnataka Election Saamtv
Published On

Karnataka Assembly Election Result: कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीचे काही कल हाती आले आहेत. जवळपास 200 जागांचे कल हाती आले आहेत. यामध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. काँग्रेस 100 आणि भाजप 96 जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. कल सातत्यानं बदलत आहेत.

Karnataka Election
Cyber Crime: सावधान! माजी पोलीस आयुक्तांच्या नावे मॅसेज आल्यास काळजी घ्या; हेमंत नगराळेंनी दिली धक्कादायक माहिती

यावेळी कर्नाटकात (Karnataka) कोणाचे सरकार स्थापन होणार? या सर्वेक्षणामुळे या प्रश्नावरचा सस्पेन्स वाढला आहे. अनेक एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला (Congress) आघाडी देण्यात आली आहे, तर काहींमध्ये चुरशीची लढत आहे. त्यामुळे कर्नाटकच्या राजकारणाचा ३८ वर्षांचा इतिहास भाजप संपवणार का याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)

काय आहे ३८ वर्षांचा खास रेकॉर्ड..

प्रत्येक राज्याच्या राजकारणातील एक खास बाब असते. कर्नाटकच्या राजकारणाचे वैशिष्टे म्हणजे तेथील जनता दुसऱ्यांदा कोणत्याही पक्षाला पुन्हा सत्ता स्थापन करण्याची संधी देत नाही. म्हणजेच राज्यात सत्तेत असलेल्या पक्षाला पुन्हा सत्ता स्थापन करण्याची संधी ३८ वर्षांत एकदाही मिळालेली नाही. कर्नाटकात 1985 पासून हा ट्रेंड सुरू आहे. यापूर्वी केवळ जनता पक्षाचे सरकार पुन्हा सत्तेवर आले होते.

Karnataka Election
Karnataka Election Result 2023: भाजपला मोठा धक्का! पहिल्या अर्ध्या तासात कॉंग्रेस १०० जागांनी आघाडीवर

पहिला कल कॉंग्रेस आघाडीवर..

कर्नाटक विधानसभेच्या सुरुवातीच्या कलात काँग्रेसला बहुमत मिळालं आहे. काँग्रेस 115 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप (BJP) 80 जागांवर आघाडीवर आहे.  त्यामुळे पहिला कल कॉंग्रेसच्या बाजूने स्पष्ट देत आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com