काय गावं आहे राव!, जेव्हा पहावं तेव्हा लोकं झोपलेलीच; कारण वाचून थक्क व्हाल

आता सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की या गावात असे काय आहे की लोकांना एवढी झोप येते की चालतानाही झोपतात.
Kazakhstan Kalachi Village
Kazakhstan Kalachi VillageSaam TV
Published On

भारतातील लोकांना अनेकदा झोप येत नसल्याच्या अनेक तक्रारी येत असतात. मग लोक विविध प्रकारच्या गोळ्यांकडे (Sleeping Pills) वळतात. परंतु कझाकस्तानमध्ये (Kazakhstan) एक गाव आहे तिथली परिस्थिती पुर्णपणे वेगळी आहे. या गावात लोक बसल्या बसल्या झोपतात (Sleeping Disorder). कोणी बोलत असेल तर त्याला कधीही झोप येऊ शकते, माणूस चालत असला तरी त्याला कधीही झोप येऊ शकते आणि तो रस्त्याच्या कडेला झोपतो. कल्पना करा, तुमच्या गावात किंवा शहरात असे घडले तर काय होईल कसे शहराचे चित्र अचानक बदलून जाईल. (Kazakhstan Kalachi Village News In Marathi)

आता सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की या गावात असे काय आहे की लोकांना एवढी झोप येते की चालतानाही झोपतात. खरंतर यामागे एक विशेष प्रकारचा डिसऑर्डर आहे, त्यामुळे संपूर्ण गाव त्रस्त आहे. आता जाणून घेवूयात की या गावात अशी परिस्थीती का आहे? हा कोणता डिसऑर्डर आहे ज्यामुळे हा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

Kazakhstan Kalachi Village
बायको अन् मेव्हणीच्या साथीनं देवाच्या दारीच चोरी; बारामतीत पडल्या बेड्या

गावाची स्थिती काय आहे?

ही कथा कझाकस्तानमधील कलाची गावातील आहे. गार्डियनच्या वृत्तानुसार, येथे परिस्थिती अशी आहे की प्रत्येकजण कधीही झोपू शकतो, मग ते घर असो, कार्यालय असो किंवा दुकान. इथली परिस्थिती इतकी बिकट आहे की, वाटेने चालत असतानाही कोणीही झोपू शकतो. एखाद्या व्यक्तीला जर झोप आली तर तो रस्त्याच्या कडेलाही झोपतो. इतकंच नाही तर एकदा झोपल्यानंतर काही वेळात ते लगेच जागे होतातच असं नाही. अनेकवेळा असे घडते की ते बरेच दिवस झोपून राहतात आणि कोणी उठवले नाही तर ते बराच वेळ तिथेच झोपून राहतात.

असे का घडते?

या गावात असे का होते ते आता समजले आहे. अहवालानुसार, जेव्हा वैज्ञानिकांनी या आजाराबाबत गावाचा अभ्यास केला तेव्हा असे आढळून आले की, तेथे कार्बन मोनोऑक्साइड आणि हायड्रोकार्बनचे प्रमाण आहे. यातून असे होते की, लोकांना शरीराला आवश्यक तेवढा ऑक्सिजन मिळत नाही आणि ते हळूहळू बेशुद्ध होतात. याशिवाय या गावात युरेनियमपासून बनवलेल्या विषारी वायूचा प्रभाव खूप जास्त असल्याचेही सांगितले जाते, त्यामुळे येथील लोक नेहमीपेक्षा जास्त झोपतात.

या गावातील पाण्यात युरेनियमच्या विषारी वायूचाही परिणाम होत असल्याने पाणीही विषारी व दूषित झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. संशोधनात असे दिसून आले आहे की पाण्यात कार्बन मोनॉक्साईड वायूचे प्रमाण जास्त आहे, ज्यामुळे लोक अनेक महिने झोपतात.

यापुढे ही तक्रार नाही

गार्डियनच्या अहवालात असेही म्हटले आहे की लोकांना आता हा त्रास राहिलेला नाही. अहवालात सरकारच्या हवाल्याने म्हटले आहे की, शास्त्रज्ञांनी या गावातील लोकांच्या झोपेच्या विकाराचे कारण शोधून काढले आहे, त्यानंतर ही समस्या राहिली नाही. तसेच, अनेक अहवालांमध्ये असे म्हटले आहे की काही वर्षांपासून लोकांना हा त्रास होत नाही आणि आता लोक सामान्य जीवन जगत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com