Accident News: सुखी संसाराचं स्वप्न अधूरं राहिलं.. लग्न करायला निघालेल्या प्रेमीयुगुलाला ट्रकने चिरडले; दोघांचाही मृत्यू

Couple Death In Road Accident: लग्न करण्यासाठी निघालेल्या प्रेमी युगुलाला भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना झारखंडमध्ये घडली. या अपघातात तरुण- तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून आणखी एक जण गंभीर जखमी झाला.
Jharkhand Accident News:
Jharkhand Accident News: Saamtv

Jharkhand Accident News:

लग्न करण्यासाठी निघालेल्या प्रेमी युगुलाला भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना झारखंडमध्ये घडली. या अपघातात तरुण- तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून आणखी एक जण गंभीर जखमी झाला. या मन सुन्न करणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, झारखंडच्या रांची-चाईबासा मुख्य मार्गावर रविवारी दुपारी भीषण अपघाताची घटना घडली. महामार्गावर भरधाव ट्रकने एका भरधाव दुचाकीला चिरडले. यावेळी दुचाकीवर एक प्रेमी युगूल आणि त्यांचा मित्र प्रवास करत होते. अपघात इतका भीषण होता की दुचाकीवरील तरुण- तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे.

दुर्दैवी बाब म्हणजे अपघातात मृत्यू झालेले तरुण- तरुणी लग्न करायला निघाले असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातातील जखमी तरुणावर चक्रधरपूर उपविभागीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेतून जमशेदपूरला पाठवण्यात आले.या जखमी तरुणाचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी घटनास्थळी असलेल्या ग्रामस्थांनी ट्रक चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

Jharkhand Accident News:
Lok Sabha Election 2024 : मराठा समाजाकडून राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात सर्वेक्षण सुरू; प्रश्नावली आली समोर

मृत तरुणांच्या गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश केरई आणि नरसिंग केरई हे दोघे दुचाकीवरून गावी गेले होते. त्यानंतर रमेश केरई हा तरुण आपल्या मैत्रिणीसह दुचाकीने चक्रधरपूरकडे निघाला होता. नरसिंग केरई हा दुचाकी चालवत होता, तर रमेश केरई आणि त्याची मैत्रीण मागे बसले होते.

दुचाकी खरसावन वळणावर येताच विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला चिरडले. दुचाकी ट्रकच्या चाकाखाली आली अन् प्रियकर-प्रेयसीचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Jharkhand Accident News:
Nashik Loksabha News: नाशिक लोकसभेवरुन शिंदे गट- भाजपमध्ये कलह! भाजप कार्यकर्ते मुंबईकडे रवाना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com