Sunjwan Attack: दहशतवाद्यांचा CISF बसवर हल्ला, चकमकीचा थरार CCTVत कैद

Sunjwan Terrorist Attack: जम्मूच्या सुंजवानमध्ये दहशतवाद्यांनी सीआयएसएफच्या बसवर हल्ला केला होता. या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.
Sunjwan Terrorist Attack
Sunjwan Terrorist AttackSaam Tv
Published On

नवी दिल्ली : जम्मूच्या सुंजवानमध्ये दहशतवाद्यांनी (Sunjwan Terrorist Attack) सीआयएसएफच्या बसवर हल्ला केला होता. या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज (CCTV footage) समोर आलं आहे. दहशतवाद्यांनी (Terrorists) सीआयएसएफच्या बसवर शुक्रवारी पहाटे ग्रेनेडचा हल्ला कसा केला, हे या व्हिडिओत स्पष्टपणे दिसून येत आहे. दोन मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये सुरूवातीला एक मोटारसायकल बॅरिकेड जवळ येऊन रस्त्याच्या कडेला थांबते. त्यानंतर सीआयएसफ जवानांची (Cisf Bus Attacks) बस बॅरिकेडजवळ येताच अचानक दहशतवादी बसवर हल्ला करतात, आणि त्यानंतर फायरिंग सुरू होते. (Jammu Kashmir Sunjwan Terrorist Attack Cctv Footage)

Sunjwan Terrorist Attack
जम्मू-काश्मीर: पंतप्रधानांच्या दौऱ्याआधी एनकाउंटर; २ दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद

एएनआयने हा व्हिडिओ ट्विट केला असून दहशतवाद्यांनी कसा घातपात घडवून आणला हे या व्हिडिओत दिसत आहे. माहितीनुसार दहशतवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्यात मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील एएसआय एसपी पटेल शहीद झाले, तर दोन पोलीस कर्मचार्‍यांसह १० सीआयएसएफ जवान जखमी झाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्या दौऱ्याच्या दोन दिवस आधी हा हल्ला झाल्याची माहिती आहे. मोदी रविवारी सांबा येथे जाणार आहेत.

बसमध्ये होते सीआयएसएफचे १५ जवान

अधिकायांऱ्यांनी माहिती देताना सांगितले की, शुक्रवारी पहाटे ४:२५ वाजेच्या सुमारास सुरक्षा रक्षकांनी दोन दहशतवाद्यांना सुंजवान लष्करी छावणीकडे जाताना पाहिले. दरम्यान, १५ जवानांना घेऊन सीआयएसएफची बस जम्मू विमानतळाच्या दिशेने जात होती. यानंतर अचानक दोन्ही दहशतवाद्यांनी बसच्या दिशेने ग्रेनेड फेकले आणि बसवर गोळीबार केला. या भ्याड हल्ल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला.

दोन्ही दहशतवाद्यांना केलं ठार

या हल्ल्यात सहाय्यक उपनिरीक्षक एस.पी पाटील शहीद झाले, तर बसमध्ये बसलेले १० जवान जखमी झाले. सीआयएसएफच्या जवानांनी या दोन्ही दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिल्यानंतर दहशतवाद्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर ते मोहम्मद अन्वर नावाच्या एका व्यक्तीच्या घरात घुसले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरक्षा दलांनी घराला वेढा घातला आणि बाथरूममध्ये जात असताना एका दहशतवाद्याला गोळ्या घालून ठार केले. यादरम्यान त्याचा एक साथीदार घरातच लपून बसला होता. त्याला ठार करण्यासाठी सुमारे पाच तास ही चकमक सुरू होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com