न्यूयॉर्क - अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची पहिली पत्नी इव्हाना ट्रम्प यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झाले आहे. इव्हाना ट्रम्प (Ivana Trump) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे. खुद्द माजी राष्ट्रपतींनी याबाबत माहिती दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवरून याबाबद माहिती दिली आहे. (Ivana Trump Passes Away)
इव्हाना ट्रम्प एक अद्भुत आणि सुंदर महिला होती जिने एक उत्कृष्ट आणि प्रेरणादायी जीवन जगले, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. इव्हाना यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना ट्रम्प टॉवरसह अनेक इमारती बनवण्यात मदत केली होती.
हे देखील पाहा -
न्यूयॉर्कमध्ये निधन
ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत इव्हाना यांना श्रद्धांजली वाहिली. पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं की, 'तुम्हा सर्वांना कळवताना मला अतिशय दु:ख होत आहे की, माझी पहिली पत्नी इव्हाना ट्रम्प यांचे न्यूयॉर्क शहरात निधन झाले आहे. ती तुमच्यापैकी अनेकांच्या प्रेरणास्थानी होती. ती एक सुंदर महिला होतीच पण तितकीच प्रेरणादायी देखील होती. इव्हाना अनेकांसाठी प्रेरणा ठरली. इव्हाना ट्रम्प यांचा त्यांची तीन मुलं डोनाल्ड ज्युनियर, इवांका आणि एरिक यांना खूप अभिमान आहे. इव्हाना ट्रम्प या एक मॉडेल होत्या, ज्यांनी 1977 मध्ये डोनाल्ड ट्रम्पशी लग्न केलं होतं. इव्हाना यांच्या निधनामुळे ट्रम्प कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आईच्या निधनावर मुलगी इवांका ट्रम्पने भावनिक पोस्ट शेअर केली आहे. इवांका म्हणाली की, आईच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे. आई हुशार, मोहक, तापट आणि विनोदी होती. तिनं आयुष्य भरभरून जगले - हसण्याची आणि नाचण्याची संधी कधीही सोडली नाही. मी तिची नेहमी आठवण ठेवीन आणि तिची आठवण माझ्या हृदयात कायम ठेवेन.
डोनाल्ड ट्रम्प यांचे तीन विवाह
डोनाल्ड ट्रम्प आणि इव्हाना ट्रम्प यांनी 90 च्या दशकाच्या सुरुवातीला घटस्फोट घेतला. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी 1993 मध्ये अभिनेत्री मार्ला मॅपल्सशी दुसरे लग्न केले. पण मॅपल्सशी ट्रम्प यांचं लग्न फार काळ टिकू शकलं नाही आणि 1999 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर 2005 मध्ये त्यांनी तिसरे लग्न मेलानिया ट्रम्प यांच्याशी लग्न केलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.