ISRO: भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने (ISRO) सोमवारी एडव्हान्स नेव्हिगेशन सॅटेलाईट लॉन्च केले. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून जिओस्टेशनरी सॅटेलाइट व्हेईकलच्या (GSLV) माध्यमातून नेव्हिगेशन सॅटेलाईट लॉन्च करण्यात आले. इस्रोचे म्हणणे आहे की, GSLV-F12 ने नेव्हिगेशन सॅटेलाईट NVS-01 यशस्वीरित्या इच्छित कक्षेत ठेवला आहे. दोन हजार किलोपेक्षा जास्त वजनाच्या या स्पेसक्राफ्ट NVS-1 मुळे भारताची जलवाहतूक आणि निगराणी क्षमता वाढवेल. या सॅटेलाईटमुळे भारताला शत्रूंवर करडी नजर ठेवता येणार आहे.
सकाळी 10.42 वाजता या सॅटेलाइटचे प्रक्षेपण करण्यात आले. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी रविवारी सकाळी 7.12 वाजता काऊंटडाऊन सुरू केले. नेव्हिगेशन सॅटेलाईट सीरिजमधील हा सेकेंड जनरेशचा रिजनल सॅटेलाईट आहे. नेव्हिगेशन सिस्टमच्या मदतीने सीमांवर लक्ष ठेवण्यासही मदत होईल. या सॅटेलाईटचे प्रक्षेपण यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले आहे.
इस्रोने सांगितले की सुमारे 20 मिनिटांच्या लिफ्ट-ऑफनंतर उपग्रह 251 किमी उंचीवर जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिट (GTO) मध्ये तैनात केला जाईल. NVS-01 च्या नेव्हिगेशन पेलोडमध्ये L1, L5 आणि S बँडचा समावेश आहे. या सॅटेलाईटचा भारताला खूप मोठा फायदा होणार आहे. यामुळे भारताला जगावर लक्ष ठेवण्यास मदत होईल.
इस्रोच्या म्हणण्यानुसार, हा नेव्हिगेशन सॅटेलाइट (NAVIC) इस्रोने विकसित केला आहे. सामान्य लोकांसाठी ते लष्करी दलांना हा सॅटेलाईट उपयुक्त ठरेल. भारतातील विमान वाहतूक क्षेत्रातील वाढती मागणी लक्षात घेता ही प्रणाली उत्तम नेव्हिगेशन, वेळ आणि स्थान निश्चित करण्यात मदत करेल. या उपग्रहाद्वारे भारत आणि आजूबाजूचा सुमारे 1500 किलोमीटरचा परिसर निगराणीखाली येईल.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.