इस्राइल-हमास यु्द्धादरम्यान हमासने इस्रायली ओलिसांच्या आणखी एका गटाची सुटका केली आहे. १७ ओलिसांचा एक गट हमासच्या बंदिवासातून इस्राइलमध्ये पोहोचला असून यात १३ इस्रायली नागरिक आणि ४ थायलंडच्या नागरिकांचा समावेश आहे. एका महत्त्वाच्या करारांतर्गत ही सुटका करण्यात आली आहे. ज्यात कतार आणि इजिप्तने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या करारांतर्गत १५० पॅलेस्टाईन कैद्यांच्या बदल्यात ५० इस्रायली नागरिकांची हमासकडून सुटका केली जाणार होती. त्यातील १७ जणांच्या दुसऱ्या गटाची आज सुटका करण्यात आली. तर ३९ पॅलेस्टाईन कैदी वेस्ट बँकमध्ये पोहोचले आहेत.
दरम्यान टेलिव्हिजनवरून प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका फूटजमध्ये इजिप्तच्या सिमेवर हमासने ओलिस ठेवले नागरिक आणि पॅलेस्टाईनचे कैदी सीमा ओलांडताना दिसत आहेत. शनिवारी रात्री उशीरा इंटरनॅशनल कमिटी ऑफ रेड क्रॉस (ICRC) च्या ताब्यात ओलितांना देण्यात आले. इस्राइलच्या पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, सुटका करण्यात आलेल्या १३ इस्रायली नागरिकांमध्ये ६ महिला आणि ७ किशोरवयीन मुलांचा समावेश आहे. या सर्व ओलितांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिथे त्यांच्या नातेवाईकांची भेट घडवून आणण्यात येणार आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
इस्राइल आणि हमासमध्ये गेल्या २ महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. यात आतापर्यंत हजारो नागरिक मारले गेले आहेत तर हजारो जखमी झाले आहेत. लोखोच्या संख्येन बेघर झाले आहेत. पुढची एक दोन दशके भरून येणार नाही इतका भयंकर विध्वंस या युद्धात पहायला मिळाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.