इस्त्रायलने चक्क मराठीत ट्विट करत मानले मुख्यमंत्र्यांचे आभार; समुद्राचं पाणी गोड होणार!

दोनशे दशलक्ष लिटर नि:क्षारीकरण प्रकल्पाचा अहवाल मुंबई पालिका व आय.डी.ई. वॉटर टेक्नॉलॉजीज लि. दरम्यान मालाड, मनोरी येथील तयार करण्याचा सामंजस्य करार सोमवारी करण्यात आला आहे.
इस्त्रायलने चक्क मराठीत ट्विट करत मानले मुख्यमंत्र्यांचे आभार; मुंबईत समुद्राचं पाणी गोड होणार !
इस्त्रायलने चक्क मराठीत ट्विट करत मानले मुख्यमंत्र्यांचे आभार; मुंबईत समुद्राचं पाणी गोड होणार !Saam Tv
Published On

पुणे : अखेर इस्राईल तंत्रज्ञानाद्वारे Israeli Technology समुद्राच्या पाण्याला गोड करण्याच्या प्रकल्पाला वेग मिळाला आहे. दोनशे दशलक्ष लिटर नि:क्षारीकरण प्रकल्पाचा अहवाल मुंबई पालिका व आय.डी.ई. वॉटर टेक्नॉलॉजीज लि. दरम्यान मालाड, मनोरी येथील तयार करण्याचा सामंजस्य करार Reconciliation agreement सोमवारी करण्यात आला. हा प्रकल्प एक क्रांतिकारी पाऊल आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी प्रतिपादन केले की, आज अनेक वर्षांच्या स्वप्नाला मूर्त रूप येत आहे. Israel Embassy tweeted in Marathi and thanked the Chief Minister

इस्रायलच्या मुंबईतील दूतावासानंही Embassy याची दखल घेतली. त्यांनी खास मराठीत ट्विट करत आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackrey यांचं अभिनंदन देखील केलं आहे. "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाण्याचे, पर्यावरणाचे आणि वेळेचे महत्व ओळखून मुंबईला नि:क्षारीकरणाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकल्याबद्दल आपले अभिनंदन. जल तंत्रज्ञानात आघाडीवर असलेला इस्रायल या वाटचालीत महाराष्ट्राच्यासोबत आहे", असे ट्विट Tweet इस्रायलच्या मुंबईतील दूतावासाकडून करण्यात आले आहे.

हा सामंजस्य करार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात करण्यात आला आहे. या कार्यक्रमास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे Aknath Shinde, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे Aditya Thackrey, इस्त्रायलचे महावाणिज्यदुत याकोव फिनकेलस्टाईन, पालिका आयुक्त इकबालसिंह चहल IqbalSingh Chahal, आय.डी.ई वॉटर टेक्नॉलीजीचे पदाधिकारी, एमएमआरडीए आयुक्त एस. श्रीनिवास उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले आपल्या सर्वांची जबाबदारी आहे "पिण्याचे पाणी २४ तास उपलब्ध करून देण्याची. मात्र यासाठी किती धरणे बांधायची आणि त्यासाठी आपण किती झाडे तोडून जमिनीचे वाळवंट करायचे ? याचा विचार करणे आणि पर्यायी मार्गाचा अवलंब करणे महत्वाचे आहे. आता मुर्त रुपाला समुद्राचे पाणी गोड करण्याचा प्रकल्प आला आहे. येत्या २०२५ पासून या प्रकल्पातून शुद्ध पाणी पुरवठा सुरु होईल". अशी माहिती त्यांनी दिली आहे.

इस्त्रायलने चक्क मराठीत ट्विट करत मानले मुख्यमंत्र्यांचे आभार; मुंबईत समुद्राचं पाणी गोड होणार !
पुढील 5 दिवस महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता... (पहा व्हिडीओ)

काय आहेत प्रकल्पाची वैशिष्ट्ये...?

  1. २०२२ मे पर्यंत डीपीआर तर २०२५ मध्ये प्रकल्प सुरू होणार. मुंबईकरांना २०० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी मिळणार आहे.

  2. पाण्याची गुणवत्ता तुलनात्मकदृष्टीने मनोरी येथे चांगली आहे.

  3. सविस्तर प्रकल्प अहवाल करार झाल्यापासून दहा महिन्यांच्या कालावधीत प्राप्त होईल. हा प्रकल्प अहवाल तयार करताना समुद्रशास्त्रीय सर्वेक्षण Oceanographic survey, भुपृष्ठीय भुभौतिकशास्त्रीय सर्वेक्षण Surface geophysical survey, पर्यावरण निर्धारण अभ्यास आदी काम केली जाणार आहेत.

    Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com