Gaza - Israel : गाझामध्ये नमाज पठणावेळी इस्रायलकडून हल्ला, १०० हून अधिक मृत्युमुखी

Israel attacks Gaza School : इस्रायलकडून गाझामध्ये हल्ले करण्यात आले. या हल्ल्यात १०० हून अधिक नागरिक मृत्युमुखी पडले.
Iisrael Attacks Palestinians at gaza School | इस्रायलकडून गाझामध्ये हल्ले सुरूच असून, एका शाळेला लक्ष्य केलं.
Iisrael Attacks Palestinians at gaza School | इस्रायलकडून गाझामध्ये हल्ले सुरूच असून, एका शाळेला लक्ष्य केलं. वृत्तसंस्था
Published On

गाझावर इस्रायलकडून हल्ले सुरूच आहेत. पॅलेस्टिनी वृत्तसंस्था WAFA च्या हवाल्यानं रॉयटर्सनं दिलेल्या रिपोर्टनुसार, पूर्व गाझामध्ये विस्थापित राहत असलेल्या एका शाळेला इस्रायली सैन्यानं लक्ष्य केलं. या भीषण हल्ल्यात १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले. वृत्तानुसार, नमाज पठणावेळी हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे.

यापूर्वी ४ ऑगस्टला गाझा शहरात विस्थापित नागरिकांचे निवारा केंद्र असलेल्या दोन शाळांवर इस्रायली सैन्यानं हल्ला केला होता. त्यात ३० नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण त्यावेळीही जखमी झाले होते. तर गाझा शहरातील आणखी एका शाळेवर झालेल्या हल्ल्यात १७ जण ठार झाले होते.

या हल्ल्याच्या घटनेवर हमासकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. इस्रायली सैन्याने नमाज अदा करणाऱ्या विस्थापित नागरिकांना लक्ष्य केले. या हल्ल्यात शेकडो मृत्युमुखी पडले. हा आकडा वाढण्याची शक्यता अधिक आहे. मागील आठवड्यातही चार शाळांवर हल्ले घडवून आणले होते.

Iisrael Attacks Palestinians at gaza School | इस्रायलकडून गाझामध्ये हल्ले सुरूच असून, एका शाळेला लक्ष्य केलं.
Air Strike On Gaza Hospital : गाझाच्या हॉस्पिटलवर इस्राइलचा एअर स्ट्राइक; ५०० नागरिकांच्या मृत्यूचा हमासचा दावा

यापूर्वी ४ ऑगस्टला गाझा शहरात विस्थापितांसाठी शाळांमध्ये व्यवस्था केली आहे. त्या दोन शाळांवर इस्रायली सैनिकांनी हल्ले चढवले होते. त्यात ३० जणांचा मृत्यू झाला. तर त्याआधी १ ऑगस्टला एका शाळेवर हल्ला केला होता. त्यात १५ नागरिक ठार झाले होते.

गेल्या काही महिन्यांपासून इस्रायलकडून गाझामध्ये शाळांसह निवासी इमारतींवर हल्ले करण्यात येत आहेत. या परिसरात दहशतवाद्यांनी आश्रय घेतला असून, ते हमास कमांड कंट्रोल सेंटरद्वारे काम करत असल्याचा दावा इस्रायलनं केला आहे.

Iisrael Attacks Palestinians at gaza School | इस्रायलकडून गाझामध्ये हल्ले सुरूच असून, एका शाळेला लक्ष्य केलं.
Gaza Airstrikes Israeli: गाझामध्ये इस्रायलचा एअर स्ट्राइक; लहान मुले, महिलांसह २० जण मृत्युमुखी, भयंकर दृश्ये

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com