Iran-Israel War: इस्त्रायलचा इराणच्या लष्करी तळावर हल्ला; एअर इंडियाने रद्द केली तेल अवीवकडे जाणारी उड्डाणे

Iran-Israel War Update: शुक्रवारी सकाळी इराणवर हल्ला करुन लष्करी तळाचे नुकसान केल्याचा दावा इस्त्रायलने केला आहे. इराणने रविवारी रात्री ३०० हून अधिक ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा हल्ला केला होता. याच हल्ल्याचे प्रत्युत्तर देण्यासाठी इस्त्रायने इराणवर हल्ला केला आहे.
Iran-Israel
Iran-Israel Dispute yandex
Published On

शुक्रवारी सकाळी इराणवर हल्ला करुन लष्करी तळाचे नुकसान केल्याचा दावा इस्त्रायलने केला आहे. इराणने रविवारी रात्री ३०० हून अधिक ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा हल्ला केला होता.याच हल्ल्याचे प्रत्युत्तर देण्यासाठी इस्त्रायने इराणवर हल्ला केला आहे. परंतु इराणमधील हल्ल्याची जबाबदारी इस्त्रायल सरकारने घेतलेली नाही.

इराणवर झालेल्या या हल्ल्यात कोणत्याही प्रकारची हानी झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर आता या हल्ल्याला इराण पुन्हा एकदा प्रत्युत्तर देणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यानंतर G7 ने दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. इराण प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, इराण इस्फहान शहरात या स्फोटांचे आवाज ऐकू आले.

इराणवर झालेल्या या हल्ल्यासाठी इस्त्रायलला जबाबदार धरले नसल्याचे इराणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. या घटनेवरुन इस्त्रायलवर हल्ला करण्याची आमची कोणतीही योजना नाही.

इस्त्रायलचे अंतर्गत सुरक्षा मंत्री इटामार बेन गिवीर यांनी या हल्ल्याबद्दल असंतोष व्यक्त केला आहे. त्यानी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी पोस्ट करत असंतोष व्यक्त केला आहे.

Iran-Israel
Odisha: ओडिशात ५० लोकांना घेऊन जाणारी बोट नदीत उलटली; एकाचा मृत्यू तर ७ जण बेपत्ता

इस्त्रायल- इराणच्या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगभरात होताना दिसत आहे. त्यामुळे देशातील अनेक विमान कंपन्यानी दोन्ही देशातील विमानसेवा निलंबित केल्या आहेत. एअर इंडियाने तेल अवीवला जाणारी उड्डाणे ३० एप्रिलपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

Iran-Israel
Bengaluru Crime News: मुलीचा जीव घेणाऱ्याचा आईकडून सूड! बेंगळुरुतील काळीज सुन्न करणारं हत्याकांड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com