Ukraine News: युक्रेनमध्ये हेलिकॉप्टर कोसळून गृहमंत्र्यांसह १६ जणांचा मृत्यू

युक्रेनच्या गृहमंत्र्यांचा हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये मृत्यू झाला आहे.
Ukraine News
Ukraine NewsSaam TV

Ukraine News: युक्रेनमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. युक्रेनच्या गृहमंत्र्यांचा हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये मृत्यू झाला आहे. राजधानी कीवच्या वेशीवर ही मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातात युक्रेनचे गृहमंत्री डेनिस मोनास्टिर्स्की यांच्यासह अन्य १६ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

युक्रेनची राजधानी कीवच्या बाहेर बालवाडीजवळ हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. त्यामुळे यात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे. अपघातामुळे घटनास्थळी आगीचे लोट दुरवर पसरले होते.

Ukraine News
युक्रेनवरून परतलेले भावी डॉक्टर अडचणीत; युक्रेनच्या प्रोग्रामला NMC ची मान्यता नाही

राष्ट्रीय पोलीस प्रमुखांनी सांगितलेल्या माहितीनुसार, युक्रेनच्या गृहमंत्र्यांसह अन्य वरिष्ठ अधिकारी देखील हेलिकॉप्टरमध्ये प्रवास करत होते. अपघातात एकूण १६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. बालवाडीजवळ ही दुर्घटना घडल्याने यात दोन लहान मुलांचा देखील मृत्यू झाला आहे. तसेच १० लहान मुलं जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. सध्या त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात अपचार सुरू आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com