कोची: भारतीय बनावटीची (Made in India) आयआनएस विक्रांत (INS Vikrant) ही विमानवाहू युद्धनौका (Aircraft carrier) लवकरच नौदलात दाखल होणार आहे. आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत (Atmnirbhar Bharat Yojna) निर्माण होणारी ही संपूर्णतः भारतीय बनावटीची युद्धनौका असून तिच्या ट्रायल्स आज घेण्यात आल्या. केरळ येथील कोची शिपयार्ड मध्ये ही युद्धनौका बनवण्यात येत असून अन्य ट्रायल्स संपल्यानंतर ती नौदलामध्ये दाखल होईल. (#INSVikrant: Aircraft carrier to enter Navy soon)
भारतीय नौदलाकडे आयएनएस विक्रांत होती. 1960 साली ब्रिटनकडून ती घेण्यात आली होती तर 1990 ला तिला निरोप देण्यात आला. नौदलाच्या परंपरेनुसार नवीन युद्धनौकेचे नावही आयएनएस विक्रांत असे ठेवण्यात आले आहे. ही युद्धनौका सर्व प्रकारच्या लढाऊ विमानांच्या टेक ऑफ आणि लँडिंगसाठी उपयुक्त अशी असेल. आणि ती भारतीय सागरी हद्दीमध्ये तैनात असेल. आयएनएस विक्रांतची ट्रायल चार दिवस अरबी समुद्रात होणार आहे. कोचिन शिपयार्ड लिमिटेडने भारतीय नौदलासाठी विमानवाहू जहाज बांधले आहे.
जहाजाच्या बोर्डावर अधिकारी आणि खलाशांसह सुमारे 1,500 अधिकारी असतात. या युद्धनौकेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे हे देशातील पहिली विमानवाहू युद्धनौका आहे. या जहाजाच्या डिझाइनवर 1999 मध्ये काम सुरू झाले तर प्रत्यक्ष बांधकाम फेब्रुवारी 2009 मध्ये सुरू झाले. वाहक 29 डिसेंबर 2011 रोजी बाहेर काढण्यात आले आणि 12 ऑगस्ट 2013 रोजी लाँच करण्यात आले. डिसेंबर 2020 मध्ये मूलभूत चाचण्या पूर्ण झाल्या. जहाजाची लांबी 262 मीटर आहे, तर त्याची बीम 62 मीटर आणि खोली 25.6 मीटर आहे.
Edited By- Anuradha
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.