Breaking: भारतात येणारं इंडिगोचं विमान थेट पाकिस्तानात पोहचलं; वाचा नेमकं काय घडलं?

गेल्या चार दिवसांत दुसऱ्यांदा इंडिगो विमानाचं इमर्जन्सी लँन्डिंग करण्यात आलं आहे.
Indigo
IndigoSaam TV
Published On

IndiGo Sharjah-Hyderabad Flight: स्पाइसजेटनंतर (Spice Jet) आता इंडिगोच्या (Indigo) विमानाचे पाकिस्तानमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. तांत्रिक बिघाडामुळे विमान पाकिस्तानातील कराची येथे उतरवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व प्रवाशांना येथे उतरवण्यात आले आहे, त्यानंतर आता विमान कंपनीने प्रवाशांसाठी दुसरे विमान पाठवले आहे. जे सर्व प्रवाशांना हैदराबादला घेऊन जाईल.

हे विमान शारजाहून हैदराबादला जात होते, जेव्हा पायलटला विमानात काही हजार फूट उंचीवर काही तांत्रिक बिघाड झाल्याचा संशय आला तेव्हा अखेर विमान कराचीत उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या या विमानाची तपासणी सुरू आहे. त्यानंतरच विमान भारतात परत आणले जाणार आहे.

इंडिगोच्या आधी, स्पाइसजेटचे विमानही काही तांत्रिक बिघाडानंतर लॅन्ड करण्यात आले. या विमानाचे इमर्जन्सी लँडिंगही पाकिस्तानातील कराची येथे करण्यात आले. या विमानात 150 लोक होते, ज्यांना प्रथम पाकिस्तानमध्ये उतरवण्यात आले आणि त्यानंतर विमानाची तपासणी करण्यात आली, त्यानंतर सर्व प्रवाशांना दुसऱ्या विमानातून दुबईला पाठवण्यात आले.

Indigo
मोठी बातमी! शिंदे सरकारचा अजित पवारांना दणका; 'त्या' कामांना दिली स्थगिती

दरम्यान, गेल्या चार दिवसांत दुसऱ्यांदा इंडिगो विमानाचं इमर्जन्सी लँन्डिंग करण्यात आलं आहे. याआधी 14 जुलैला देखील इंडिगोच्या विमानाचं लॅन्डिंग जयपूर विमानतळावर करण्यात आलेलं होतं. इंजिनमध्ये कंप जाणवू लागल्यानं 14 जुलैला विमान मध्येच लॅन्ड करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सुरक्षेचा कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com